खासगी जागेतील 'तो' चर बुजवा, मीराबाग-सावर्डे ग्रामसभा तापली; बंधाऱ्यासाठी केले होते खोदकाम

Mirabag Sanvordem gram sabha : मीराबाग-सावर्डे येथील प्रस्तावित बंधारा राज्य सरकारने रद्द केला असला तरी मीराबाग येथील लोकांनी झालेल्या ग्रामसभेत या बंधाऱ्यासाठी खासगी जागेत खोदलेला चर बुजवावा, अशी मागणी करत पंचायत मंडळाला धारेवर धरले.
Mirabag Sanvordem gram sabha
Mirabag Sanvordem gram sabhaDainik Gomantak
Published on
Updated on

केपे: मीराबाग-सावर्डे येथील प्रस्तावित बंधारा राज्य सरकारने रद्द केला असला तरी मीराबाग येथील लोकांनी झालेल्या ग्रामसभेत या बंधाऱ्यासाठी खासगी जागेत खोदलेला चर बुजवावा, अशी मागणी करत पंचायत मंडळाला धारेवर धरले.

काही गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी पंचायत मंडळाने मांडलेल्या ठरावाला विरोध करून पंपाद्वारे पाणी पुरवठा करण्यासही विरोध दर्शविला. सावर्डे पंचायत क्षेत्रातील दुलबानगर, कष्टीमळ व या भागातील सुमारे ७० लोकांनी सह्यांचे निवेदन पंचायत मंडळाला सादर करून पिण्यासाठी व बागायतीसाठी पाणी देण्यासाठी झुआरी नदीचे पाणी पंपाद्वारे खेचून त्याचे शुद्धीकरण करून पुरवठा करावा, असा ठराव ग्रामसभेत घ्यावा, अशी मागणी केली होती; पण या प्रकल्पाला मीराबाग येथे बंधाऱ्याविरोधात आंदोलन करणारे संकेत भंडारी आणि उपेंद्र नाईक यांनी विरोध केला.

Mirabag Sanvordem gram sabha
Goa Voter List: मतदार कपातीत गोवा सातव्या क्रमांकावर, 10.02 टक्‍के मतदारांना वगळले

संबंधित गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी पूर्वी सरकारने सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे साळावलीचे पाणी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्याद्वारेच त्या गावांना पाणी द्यावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी पंच संजय नाईक म्हणाले, सरकारने पाण्याची टाकी बांधण्याचा प्रयत्न केला होता; पण टाकी बांधण्यासाठी निवडलेली जागा अपुरी तसेच त्या जागेच्या सर्व मालकांनी ना हरकत दाखले देण्यास टाळाटाळ केल्याने हे काम होऊ शकले नाही.

ज्याप्रमाणे चौगुले कंपनीने ५० वर्षे झुआरी नदीचे पाणी पंपाद्वारे नेले होते, तसेच संबंधित गावांमधील लोकांना पाणी दिल्यास याचा सर्वांनाच फायदा होईल, असे नाईक यांनी सांगितले.

Mirabag Sanvordem gram sabha
Goa Drug Peddling: कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर उघडपणे होतेय ड्रग्‍सविक्री, परदेशी पर्यटकाने पोलखोल केल्याने खळबळ

गांजा प्रश्‍नावरून दोन गटांत वाद

सावर्डे पंचायत क्षेत्रातील युवक गांजाच्या आहारी गेले असून गांजा विकणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी आज झालेल्या सावर्डे पंचायतीच्या ग्रामसभेत स्थानिकांनी केली.

यावेळी या विषयावरून काही वेळ दोन गटांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांना शांत केले. सावर्डे पंचायत क्षेत्रातील ज्या ठिकाणी बसून युवक गांजा ओढतात, त्याठिकाणी पोलिसांनी पहारा द्यावा तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com