Goa Crime News: सख्ख्या काकाने रक्ताच्या नात्याला काळिमा फासला; 2 अल्पवयीन मुलींवर केला लैंगिक अत्याचार

Margao Crime News: पीडित मुलींची आई कामानिमित्त हल्लीच बाहेरगावी गेली होती. त्यावेळी तो त्यांना शाळेतून आणताना त्यांच्याशी लैंगिक चाळे करीत होता.
Assault Case Goa
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना फातोर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, सख्ख्या काकानेच दोन अल्पवयीन पुतण्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले. नराधम काकाच्या हाती पोलिसांनी बेड्या ठोकून त्याला गजाआड केले आहे.

चोंदूला ऊर्फ चंदू सोरेन (वय ५१ वर्षे) असे या संशयिताचे नाव आहे. पीडित मुलींच्या आईने याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदविल्यानंतर फातोर्डा पोलिसांनी त्वरित कारवाई करून संशयिताला अटक केली. त्याची सध्या चौकशी सुरू असल्याची माहिती फातोर्डा पोलिस ठाण्याचे निरीक्षक नॅथन आल्मेदा यांनी दिली. संशयित झारखंड राज्यातील आहे.

Assault Case Goa
शाळेतून घेऊन यायला ज्याला सांगितले त्यानेच घात केला; फातोर्ड्यात 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, झारखंडच्या एकाला अटक

या दोन्ही मुली अवघ्या आठ आणि नऊ वर्षांच्या असून, त्यांनाच चंदूने वासनेचे शिकार बनविले. संशयित चंदूवर पोस्को कायदा व गोवा बाल कायदा कलम ८ अंतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. 'बायलांचो एकवोट' संघटनेच्या अध्यक्ष आवदा व्हिएगस यांनी ही घटना अत्यंत धक्कादायक असल्याचे सांगितले.

प्ररप्रांतीय कामगारांना आणताना त्यांच्या मुलांची देखभाल करण्यासाठी ठेकेदारानेही उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे. अशा प्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांवर सर्वांनीच विचार करण्याची वेळ आली असल्याचे त्या म्हणाल्या.

Assault Case Goa
Goa Express: गोव्यात मिळाला नाही रोजगार, गावी माघारी जाताना तुटला पाय; गोवा एक्सप्रेसमध्ये घडला अपघात

चिमुकल्यांना जीवे मारण्याची धमकी

पीडित मुलींची आई कामानिमित्त हल्लीच बाहेरगावी गेली होती. त्यावेळी तो त्यांना शाळेतून आणताना चंदू त्यांच्याशी लैंगिक चाळे करीत होता, असे पोलिस तपासात आढळून आले आहे. या प्रकरणाची कुठेही वाच्यता केल्यास तुम्हाला कायमचे संपवून टाकू, अशी धमकीही त्याने मुलींना दिली होती. मार्च व एप्रिल महिन्यांत त्याने या निरपराध चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com