Goa BJP: 'पक्ष व सरकार यांच्यात समन्वय पाहिजेच'; गोवा भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची तंबी

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री म्हणाले सरकार ही सामूहिक प्रक्रिया असते त्यामुळे माझ्या खात्याचा त्याच्याशी संबंध नाही अशी भूमिका जाहीरपणे घेता येणार नाही
CM Pramod Sawant: मुख्यमंत्री म्हणाले सरकार ही सामूहिक प्रक्रिया असते त्यामुळे माझ्या खात्याचा त्याच्याशी संबंध नाही अशी भूमिका जाहीरपणे घेता येणार नाही
CM Pramod Sawant|Sadanand Tanavade Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa BJP Meeting

पणजी: सरकारमधील बाबींवर मंत्री व आमदारांनी जाहीरपणे वक्तव्य करू नये. मंत्र्यांनी आपल्या खात्यापुरतीच माहिती द्यावी, त्यांनी दुसऱ्याच्या खात्यावर टीका करू नये, अशी तंबी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना नादुरूस्त रस्त्यासाठी जबाबदार धरणारे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी भाजप गाभा समितीच्या या बैठकीला दांडी मारल्याने काल जाहीर केल्यानुसार, तानावडे यांना त्यांना जाब विचारता आला नाही.

येथील एका हॉटेलात ही बैठक झाली. त्या बैठकीला नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे, कृषीमंत्री रवी नाईक, आमदार राजेश फळदेसाई, नीलेश काब्राल, जेनिफर मोन्सेरात उपस्थित नव्हते. या बैठकीत स्वच्छता पंधरवडा व सदस्यत्व मोहिमेत सर्वांना सहभागी होण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. हे सारे करताना पक्ष व सरकार यांच्यात समन्वय असणे आवश्यक असण्यावर भर देण्यात आला.

मुख्यमंत्री म्हणाले, सरकार ही सामूहिक प्रक्रिया असते. मंत्रिमंडळाची जबाबदारीही सामूहिक असते. अमूक खात्याने ते केले माझ्या खात्याचा त्याच्याशी संबंध नाही, अशी भूमिका कोणालाही जाहीरपणे घेता येणार नाही. सरकार म्हणून प्रत्येक खात्याच्या निर्णयाची जबाबदारी ही प्रत्येकाची असते. आमदारांनीही सरकराच्या कारभारावर जाहीरपणे भाष्य करू नये.

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री म्हणाले सरकार ही सामूहिक प्रक्रिया असते त्यामुळे माझ्या खात्याचा त्याच्याशी संबंध नाही अशी भूमिका जाहीरपणे घेता येणार नाही
Goa BJP: भाजपमधील सुंदोपसुंदीची दिल्लीत दखल

त्यांच्या समस्या संबंधित मंत्र्याकडे मांडाव्यात, तेथे न्याय मिळत नाही असे वाटल्यास मला सांगाव्यात. प्रदेशाध्यक्ष व मी समस्या सोडवू. येथे न्याय मिळत नाही, असे वाटल्यास राष्ट्रीय नेत्यांकडेही दाद मागता येते. ते राज्याच्या दौऱ्यावर येतात व संवाद साधतात. मात्र जाहीर वक्तव्याने सरकार व पक्षाची हानी होते, हे लक्षात घ्यावे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी बुधवारी आपण गुदिन्होंसह अन्य मंत्र्यांनी वा आमदारांनी केलेल्या सरकारसंबंधी वा खात्यांच्या कामकाजासंबंधीच्या विधानांबाबत बोलणार आहे, असे सांगितले होते.

मात्र, आज गाभा समितीच्या बैठकीत ज्या मंत्री वा आमदारांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते, त्यांनीच दांडी मारली. त्यामुळे सरकारसंबंधी वा इतरांच्या खात्याबाबत टीकात्मक विधाने करणाऱ्या मंत्र्यांना तंबी देणे तानावडे यांना शक्य झाले नाही.

पक्षीय मंचावर आपली मते व्यक्त करता येतात. जाहीरपणे कोणी सरकारविरोधात बोलले की त्याचा फायदा विरोधक घेतात. राजकीयदृष्ट्या तसे परवडणारे नाही. कोणाचेही कोणाचीही मतभेद नसतात पण बोलण्यावरून तसे मतभेद आहेत, असे चित्र तयार होते. ते पक्ष संघटना व सरकारसाठी हिताचे नसते. यासाठी कोणालाही कोणत्याही विषयावर मत मांडायचे असल्यास त्यांनी प्रथम पक्षाच्या मंचावर ते मांडावे. ते प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष या नात्याने आपण काम करू.

सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com