राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) संपर्कात विद्यमान सरकारमधील (Goa Government) मंत्री आमदार तसेच भाजपचे (BJP) काही माजी मंत्री आमदार आमच्या संपर्कात असल्याची माहिती गोवा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा माजी महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा यांनी दिली. तसेच 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप विरोधी महायुतीच्या पक्षानी सर्वप्रथम सर्वदलीय बैठक घेण्याची मागणी माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी केली. (Ministers and MLAs in Goa BJP government are in touch with NCP)
वास्को येथे काल मंगळवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेतून वरील माहिती गोवा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा माजी महसूल मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी दिली. यावेळी त्यांच्या समवेत प्रितम नाईक, शाहिद शेख, मनोज नाईक, प्रशांत लोटलीकर उपस्थित होते. पुढे पत्रकारांना माहिती देताना माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा म्हणाले की विद्यमान भाजप सरकारमधील मंत्री, आमदार, गोवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्कात आहे. 2022 मध्ये होणारी गोवा विधानसभा निवडणुकी भाजप मधील मंत्री, आमदार तसेच माजी आमदार सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारीसाठी आमच्या पक्षाच्या केंद्रीय नेत्यांच्या संपर्कात आहे. तसेच काँग्रेस मधील दहा आमदार भाजपमध्ये गेले यातील सुद्धा काही आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती माजी मंत्री डिसोजा यांनी पत्रकार परिषदेतून केली.
राज्यात येणारी विधानसभा निवडणूक काँग्रेस, गोवा फॉरवर्ड व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुती करून लढवावी. यासाठी सर्वप्रथम या पक्षातील सर्वदलीय बैठक घेणे महत्त्वाची असल्याचे माहिती माजी मंत्री डिसोजा यांनी पत्रकार परिषदेतून केली. गोव्यात आम आदमी पक्षाला येथील जनता कदापि आपले म्हणून स्वीकार करणार नाही. कारण दिल्लीत आपच्या सरकारने 'लिट्ल फ्लॉवर' चर्च पाडल्याने येथील ख्रिश्चन बांधव या पक्षावर नाराज असल्याची माहिती डिसोझा यांनी दिली.
याप्रसंगी माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी गोव्यात होणारी 2022 मधील विधानसभा निवडणूक वास्को किंवा दाबोळीतून लढविणार असल्याची माहिती दिली. दाबोळी येथील आमदार माविन गुदिन्हो यांनी मला दाबोळीतून निवडणूक लढविणार म्हणून माझे अभिनंदन केले असल्याने यावर मी योग्य वेळी निर्णय घेणार असल्याची माहिती डिसोझा यांनी पत्रकार परिषदेतून केली. वास्कोतील नवेवाडे, वाडे भागातील अनेकांनी माझ्याशी संपर्क करून येणारी निवडणूक लढवावी अशी मागणी करीत आहे. कारण वास्को मतदार संघातील नवेवाडे, वाडे हा भाग पूर्वी वास्कोत होता तो आता दाबोळीत येत असल्याने याचा फायदा मला होण्याची शक्यता असल्याची डिसोझा यांनी सांगितले.
वास्को व दाबोळी येथील मुख्य रस्त्याची पावसाळ्यात खूपच दुर्दशा झाली आहे. दोन्ही मतदारसंघात रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने अपघातांना आमंत्रण देत आहे. जर पुढील काही दिवसात या रस्त्यावरील खड्डे बुजवले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर येऊन आंदोलन छेडणार अशी चेतावणी दिली. वास्को व दाबोळी येथील लोकप्रतिनिधी रस्त्यावरील खड्डे यावर लक्ष दिले नसल्याने अनेक वाहन चालकांना अपघाताला सामोरे जावे लागत असल्याची माहिती डिसोजा यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वास्को पोलिसांचे अभिनंदन
बोगमाळो रंगवी इस्टेट परिसरात नवेवाडे येथील अमर नाईक यांचा खून करणाऱ्या आरोपींना वास्को पोलिसांनी त्वरित गजाआड केल्याप्रकरणी गोवा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी अभिनंदन केले आहे. अमर नाईक यांचा खून करणारे तीनही आरोपी इतर राज्यातील असल्याने त्यांना त्वरित पकडल्याबद्दल वास्को पोलीस खऱ्या अर्थाने अभिनंदनास पात्र असल्याची माहिती शेवटी जुझे फिलिप डिसोझा यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.