सांगोडमधील शेतकरी नाराज : जलस्रोतमंत्र्यांनी दिला होता शब्‍द; शेती संकटात

खंदकातून पाणीपुरवठा हे आश्‍‍वासनच!
Khandepar Canal
Khandepar CanalDainik Gomantak
Published on
Updated on

कुळे : मोलेधाट-सांगोड येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी योग्यप्रकारे पाण्याचा पुरवठा होत नसल्याने सांगोड येथील शेती धोक्यात आली आहे. शेतीसाठी तुम्हाला पाणी कमी पडणार नाही. त्यासाठी गरज पडल्यास खाणपीठातील (खंदक) पाणी काढून दिले जाईल, असे आश्वासन जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिले होते.

त्यावर विश्‍वास ठेवून शेतकऱ्यांनी शेती केली; पण पाणीच योग्य प्रकारे मिळत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोत खात्याच्या कारभारावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या १५ हेक्टर सुपीक जमिनीत आम्ही शेती लागवड केली. यासाठी पाण्याचा पुरवठा आम्हाला खांडेपार कॅनलद्वारे होत होता; पण काही दिवसांपासून योग्य असा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे शेती धोक्यात आलेली आहे. आताच काही प्रमाणात भातपीक तयार होत आहे. योग्य प्रकारे जर पाणी मिळाले नाही तर त्या भाताचे रूपांतर पोलात (पोके) होऊन आम्हाला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

Khandepar Canal
Goa Farmer : आधारभूत किमतीची त्‍वरित अंमलबजावणी आवश्‍‍यक

योग्य पाणीपुरवठा व्हावा यासाठी सरकारचे मंत्री सुभाष शिरोडकर व संबंधित खात्याने सतत लक्ष द्यावे व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली. स्थानिक पंच विठोबा मळेकर, वामन गावकर, अध्यक्ष संतोष सांगोडकर तसेच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

जलस्रोत खात्याच्या कारभारावर नाराजी ः शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोत खात्याच्या कारभारावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतीला वेळेत पाणी मिळाले नाही तर आमच्‍या कष्‍टाचे काय?, शिवाय आमचे मोठे आर्थिक नुकसान होणार त्‍यास जबाबदार कोण? असे सवाल शेतकऱ्यांनी उपस्‍थित केले आहेत.

Khandepar Canal
Goa Farmers : शेतकऱ्यांसाठी खुशखबर; ‘मानकुराद’, कोकम, काजू, जायफळाच्या 8 नव्या जाती

सर्व शेतकऱ्यांना खाणपीठातील पाणी काढून देणार असे आश्वासन दिले होते. पण आजपर्यंत ते शक्य झाले नाही. यासंदर्भात आम्ही विचारले तेव्हा एका खाणीत पंप बसवून पाणी देण्यासाठी संबंधित खाते प्रयत्नशील असून यावर्षी ते शक्य नाही, असे सांगितले. पाण्याअभावी शेती करपली तर कृषी खात्याने सर्व शेतकऱ्यांना आर्थिकरूपी मदत करावी.

- संतोष सांगडकर, अध्यक्ष, शेतकरी संघटना सांगोड

Khandepar Canal
Farmers: शेतकऱ्यांचे बल्ले-बल्ले, सरकारने केली 'ही' मोठी घोषणा; खराब हवामानामुळे...

खांडेपार कॅनलला दूधसागर नदीचे पाणी येते आणि तेच पाणी या कॅनलवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना मिळते. दूधसागर नदीतील पाणी कमी झाले असल्याने हवा तेवढा पाण्याचा पुरवठा कॅनलमधून होत नाही. याच परिसरात असलेल्या पंचायतीच्या विहिरीत ५ एचपी पंप बसवून त्याद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रश्न काही प्रमाणात तरी सुटेल.

- सागर नाईक, कनिष्ठ अभियंता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com