Vishwajit Rane withdraws his statement : गेल्या आठवड्यात गुरुवारी विधानसभेत ‘व्याघ्रक्षेत्र’ संदर्भात चर्चा करताना वनमंत्री विश्वजीत राणे यांनी ‘गोवा फाउंडेशन’वर जोरदार टीका केली होती. तेव्हा त्यांनी ‘गोवा फाउंडेशन’ फ्रॉड आहे, असा उल्लेख केला होता.
मात्र, आज राणे यांनी ‘गोवा फाउंडेशन’विषयी वापरलेला ‘फ्रॉड’ शब्द मागे घेत असल्याचे सांगितले. कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास आपण दिलगिरी व्यक्त करतो, असेही ते म्हणाले.
तथापि, व्याघ्र प्रकल्पाविषयी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत आहोत. सरकार काणकोण ते सत्तरी या भागातील जनतेबरोबर आहे. वनक्षेत्रांत राहणाऱ्या जनतेचे संरक्षण करणे आमचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.
गोवा फाउंडेशनने जनहित याचिका सादर करून म्हादई अभयारण्य व आजूबाजूचा परिसर व्याघ्र क्षेत्र घोषित करण्याची विनंती केली होती. याचिकेवर निर्णय देत म्हादई वन्यजीव अभयारण्य व आजूबाजूचा परिसर व्याघ्रक्षेत्र म्हणून तीन महिन्यांत अधिसूचित करण्याचा महत्त्वपूर्ण निवाडा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला.
याच व्याघ्रप्रकल्पाचा चर्चेवेळी एनजीओ गोव्याची वाट लावत आहेत. या सभागृहाची ताकद एजीओंच्या हातात देऊ नका, असे मंत्री विश्वजीत राणे यांनी विरोधकांना सुनावले होते.
त्यानंतर गोवा फाऊंडेशनमुळेच मायनिंगमधील 45 हजार कोटी राज्याला मिळाले आहेत. आणि गोवा फाऊंडेशनवर मंत्री राणे आरोप करत आहेत. असा सवाल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार विजय सरदेसाई यांनी केला.
आमदार व्हेन्झी व्हिएगास म्हणाले, गोवा फाऊंडेशन ही आदरणीय एनजीओ आहे. त्यातील लोक आरदणीय आहेत. मंत्री विश्वजीत राणे यांनी त्या एनजीओ बाबत काय बोलले ते शब्द मागे घ्यावेत अशी मागणी केली होती.
दरम्यान, गोवा फांऊडेशनला उद्देशून म्हटलेला 'फ्रॉड' हा शब्द मागे घेत असल्याची माहिती आज विधानसभेत मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. तसेच याबाबत भावना दुखावल्याबद्दल त्यांनी यावेळी दिलगीरी व्यक्त केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.