जयपूर-मुंबई एक्स्प्रेस गोळीबार! शहीद ASI यांचा मुलगा गोव्यात तर पत्नी गावाला, गावकरी मुद्दाम टाळतायेत माहिती

गोळीबारात एएसआय टिकाराम मीणा यांच्यासह अन्य तीन जणांचा गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे.
Jaipur-Mumbai train RPF constable Fire
Jaipur-Mumbai train RPF constable Fire ANI
Published on
Updated on

जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये सोमवारी सकाळी झालेल्या गोळीबारात चार जण ठार झाले. आरपीएफच्या एका जवानाने ट्रेनमध्ये गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. या गोळीबारात एएसआय टिकाराम मीणा यांच्यासह अन्य तीन जणांचा गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे.

गोळीबारानंतर चौघांचा जागीच मृत्यू झाला. कॉन्स्टेबल चेतन याने हा गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेत शहीद झालेले एएसआय टिकाराम मीणा हे राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील श्यामपुरा गावचे रहिवासी होते. या घटनेने श्यामपुरा गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या घटनेची माहिती मृत एएसआयच्या पत्नीला गावकरी व इतर नातेवाईकांनी अद्याप दिलेली नाही. घटनेची माहिती दिल्यास त्यांना धक्का बसेल, तसेच मृताचा मृतदेह येण्यास वेळ लागू शकतो यामुळे त्यांना अद्याप माहिती देण्यात आली नाही.

मृत एएसआय टिकाराम मीना यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 25 वर्षांची मुलगी पूजा मीना हिचे लग्न झाले आहे. तर, 35 वर्षीय मुलगा राजेंद्र मीना याचेही लग्न झाले असून तो बेरोजगार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या मुलगा राजेंद्र हा गोव्यात फिरण्यासाठी आला होता. गावकऱ्यांनी मुलाला घटनेची माहिती दिली असून तो घटनास्थळी रवाना झाला आहे.

Jaipur-Mumbai train RPF constable Fire
काय हमी की गोव्याचा मणिपूर होणार नाही? विजय सरदेसाई म्हणतात निलंबनाची कारवाई लोकशाही विरोधी

याघटनेमुळे गावात शोकाकुल वातावरण आहे. घटनेची माहिती मृताची पत्नी बर्फी आणि आई गोली देवी यांना देण्यात आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मृत एएसआय टिकाराम मीना हे शेतकरी कुटुंबातील असून, त्यांच्याकडे थोडीच शेती असल्याचे सांगण्यात येते. गावकरी सध्या मृतदेह येण्याची वाट पाहत आहेत.

दरम्यान, जयपूरहून मुंबईला येत असलेल्या जयपूर एक्सप्रेसमध्ये सोमवारी सकाळी वापी ते सुरत दरम्यान एका आरपीएफ कॉन्स्टेबलने गोळीबार केला. सोमवारी पहाटे झालेल्या घटनेत, एका रेल्वे पोलिसासह चौघांचा मृत्यू झाला आहे. गोळीबार करणाऱ्या आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन याला पोलिसांनी मीरा रोड येथून अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com