मंत्री सुदीन ढवळीकर म्हणतात, 'गोव्यात मराठी राजभाषा होणे कठीण'

Marathi Language In Goa: गोव्यात कोकणीसह मराठी भाषेला राजभाषाचे दर्जा देण्यात यावा यासाठी प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्यासह मराठीप्रेमी राज्यभर जनजागृतीपर सभा घेत आहेत.
Minister Sudin Dhavalikar On Marathi Language In Goa
Minister Sudin DhavalikarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते आणि विद्यमान वीज खात्याचे मंत्री सुदीन ढवळीकर यांनी मराठी भाषेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. गोव्यात मराठी राजभाषा होणे कठीण असल्याचे मत त्यांनी मांडले आहे. मराठी राजभाषा व्हावी या मागणीसाठी राज्यभर मराठीप्रेमी आंदोलन करत असताना मंत्री ढवळीकरांनी केलेल्या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे.

सुभाष वेलिंगकर यांच्यासह राज्यातील मराठीप्रेमी राज्यभर मराठी राजभाषा व्हावी म्हणून आंदोलन करत असल्याचा संदर्भ देऊन मंत्री ढवळीकरांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

"जनजागृती सुरु आहेत ही चांगली बाब आहे. आम्ही १९८४, ८५ आणि ८६ मध्ये मराठी समर्थकांनी रवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. याकाळात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली दरम्यान गोळीबार झाला आणि दोघांचा जीव देखील गेला. अशा स्थिती पुन्हा गोव्यात निर्माण होऊ नये," असे मंत्री ढवळीकर म्हणाले.

Minister Sudin Dhavalikar On Marathi Language In Goa
Viral Video: मुख्यमंत्र्यांना पाहताच बिलगली, गळ्यात पडून घट्ट मिठी मारली; प्रमोद सावंत आणि चिमुकलीचा गोड व्हिडिओ पाहा

"महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष पहिल्यापासून मराठीच्या समर्थनात आहे. कालांतराने कोकणी राजभाषा झाली त्यानंतर मराठी आणि कोकणी दोन्ही भाषा सोबत घेऊन पुढे जावे अशी भूमिका पक्षाने घेतली," असेही ढवळीकरांनी यावेळी स्पष्ट केले.

गोव्यात कोकणीसह मराठी भाषेला राजभाषाचे दर्जा देण्यात यावा यासाठी प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्यासह मराठीप्रेमी राज्यभर जनजागृतीपर सभा घेत आहेत.

Minister Sudin Dhavalikar On Marathi Language In Goa
PM Modi Speech: टॅक्सचं ओझं कमी होणार, तरुणांसाठी रोजगार योजना; PM मोदींच्या लाल किल्ल्यावरुन दोन मोठ्या घोषणा

विधानसभेत जीत आरोलकरांनी उपस्थित केला मुद्दा

नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात मांद्रेचे मगो आमदार जीत आरोलकरांनी मराठीला राजभाषेचा अशी मागणी मराठीप्रेमी करत असल्याचा मुद्दा मांडला होता. याला विरोधकांनी विरोध दर्शवला असताना देखील आरोलकरांनी मुद्दा मांडला होता. दरम्यान, आता मगोचे वरिष्ठ नेते आणि मंत्री ढवळीकरांनी मराठी राजभाषा होणे कठीण असल्याचे मत व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com