Socorro Gram Sabha : पर्वरी, २६ ऑक्टोबर रोजी पंचायत सदस्यांच्या बैठकीमध्ये वीस कलमी वसाहतीतील नीलेश च्यारी यांच्या घरावर पंचायतीतर्फे कारवाई करण्याचे ठरवले होते. परंतु ती कारवाई न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे पुढे ढकलण्यात आली.
याविषयावर ग्रामस्थ अनिल पेडणेकर, पंचसदस्य व ग्रामस्थांत बरीच चर्चा झाली. या प्रकरणातील दोन्हीही ग्रामस्थांनी एकमेकांविरोधातील आपआपली तक्रार मागे घेतली.
सुकूर पंचायतीची ग्रामसभा पंचायत सभागृहात रविवार, २९ ऑक्टोबर रोजी सकाळी सरपंच सोनिया पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या ग्रामसभेत सरपंचांसह, उपसरपंच माया केणी, पंच राजन ऊर्फ रवळू पार्सेकर, ॲश्ली लोबो, गौरी वळवईकर, सर्वेश हळर्णकर, शीतल अरोलकर, दीपाली सातार्डेकर, सचिव सतीश गावस व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
पार्किंग जागा बदलू नये!
पंचायत सभागृह लग्नादी समारंभांसाठी भाड्याने देताना पार्किंगसाठी निवडलेल्या जागेवर बरीच चर्चा झाली. काही ग्रामस्थांनी आता निश्चित केले तेथेच पार्किंग ठेवावे, असे सांगितले.
इतर अनेक विषयांवर चर्चा होऊन या ग्रामसभेची सांगता झाली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.