'ते' महान अभिनेते त्यांना गोमंत भूषण द्या! मंत्री रमेश तवडकरांनी गोविंद गावडेंवर खोचक टोला लगावत सगळा इतिहासच काढला

Ramesh Tawadkar controversy: मंत्री रमेश तवडकर आणि आमदार गोविंद गावडे यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे, यावेळी तवडकर यांनी गावडे यांच्यावर थेट शाब्दिक हल्ला चढवला
Ramesh Tawadkar latest
Ramesh Tawadkar latestDainik Gomantak
Published on
Updated on

Tawadkar Gaude clash Goa

पणजी: गोव्याच्या राजकारणात सध्या एका नव्या वादाची ठिणगी पडली आहे. मंत्री रमेश तवडकर आणि आमदार गोविंद गावडे यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. यावेळी तवडकर यांनी गावडे यांच्यावर थेट शाब्दिक हल्ला चढवला.

तवडकरांचा रोखठोक सवाल: 'गावडे कोण?'

गावडे यांनी केलेल्या काही कामांवरून टीका करताना तवडकर म्हणाले, "शहाजहानने त्याच्या काळात ताजमहाल बांधला. पण, गोविंद गावडेंनी लोकशाही राज्यात ताजमहाल बांधून दाखवलाय." एवढंच नव्हे, तर त्यांनी गोविंद गावडे हे एक महान अभिनेते असून, त्यांना अभिनयातील योगदानाबद्दल सरकारने 'गोमंत भूषण' पुरस्कार द्यावा, अशी उपरोधिक मागणीही केली.

रमेश तवडकर यांनी यावेळी पूर्णपणे आक्रमक स्वरूप धारण केले असून त्यांनी थेट गावडे यांच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले. "काणकोणाच्या जनतेने मला चार वेळा निवडून दिले, तेव्हा माझ्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे गोविंद गावडे कोण?" असा रोखठोक सवाल त्यांनी विचारला.

तसेच, गोविंद गावडे ज्या उपक्रमांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत, ते सर्व उपक्रम आपण १९९६ पासूनच सुरू केले होते, असा दावाही त्यांनी केला. त्यावेळी गोविंद गावडे यांना आपण ओळखतही नव्हतो, असे तवडकरांनी सांगितले.

Ramesh Tawadkar latest
Ramesh Tawadkar: मंत्रिपद नकोच होते! का झाले रमेश तवडकर मंत्री? चार दिवसांनी दिले स्पष्टीकरण

'गावडे अदृश्य अवस्थेत होते'

गोविंद गावडे यांनी केलेले आरोप फेटाळून लावताना तवडकर म्हणाले की, "गोविंद गावडे १३ वर्षांनंतर आले आहेत. त्यामुळे मी त्यांच्या वाटेवर जातोय असे ते म्हणत असतील तर ते कोणत्या अदृश्य अवस्थेत होते? कुणी देवचाराच्या रूपात की आणखीन कोणत्या स्वरूपात ते आले होते हे मला माहिती नाही." अशा शब्दांत त्यांनी गावडे यांच्या आरोपांची खिल्ली उडवली. तवडकर यांनी आपली राजकीय वाटचाल आणि संघर्ष याबद्दलही यावेळी भाष्य केले.

'माझ्यासाठी तो काळ कठीण होता'

गोविंद गावडे यांच्यासाठी आपण अनेक धोके पत्करले, पण त्याचे दुष्परिणाम आपल्या मतदारसंघाला भोगावे लागले, असे तवडकर म्हणाले. "दीपक ढवळीकर आणि सुदिन ढवळीकर यांचा रोष पत्करून मी आमदार गावडे यांच्यासाठी दारं सताड उघडी ठेवली. मात्र, त्याचे काय दुष्परिणाम झाले ते माझ्या मतदारसंघाने बघितले आहेत, आम्ही ते पचवले आहेत," असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "गोविंद गावडे मंत्री असताना त्यांचे काही समर्थक वाघ झाले होते, पण माझ्यासाठी मात्र तो काळ कठीण होता. तरीही २०२२ मध्ये मी आमदार झालो आणि सभापतीही झालो, तेव्हा गावडे देखील मंत्री झाले होते, यानंतर गावडे कसे आणि काय बोलले हे सगळ्यांनी पाहिले आहे. मी त्याला हात किंवा बोटसुद्धा लावलेले नाही."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com