CM Pramod Sawant: खाणी लवकरच सुरू होवाेत, CM प्रमोद सावंत यांची बाप्पा चरणी प्रार्थना

Ganesh Chaturthi 2023: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे निवासस्थान गेल्या काही वर्षांपासून साखळी शहरात असले तरी ते गणेशोत्सवाला कुडणे या मूळ गावी जातात.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Ganesh Chaturthi 2023: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे निवासस्थान गेल्या काही वर्षांपासून साखळी शहरात असले तरी ते गणेशोत्सवाला कुडणे या मूळ गावी जातात. पूर्वापार पद्धतीने त्यांच्या घरात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेकजण सध्या कुडणे येथे भेट देत आहेत. राज्‍यातील खाणी लवकर सुरू होऊन सर्वांची भरभराट होवो आणि राज्य कर्जमुक्त होवो, अशी प्रार्थना त्‍यांनी श्री गणरायाकडे केली.

CM Pramod Sawant
Goa Tourism: पर्यटन सफारींसाठी खास सुरू केलेली ‘हॉप ऑन’ची पर्यटकांना भुरळ

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गणेशोत्‍सव साजरा करण्याबाबत सांगितले की, हा जीवनातील आनंदाचा सोहळा असतो. लहानपणापासून या सणाचे आकर्षण वाटत आले आहे. दरवर्षी चतुर्थी कधी येते याची प्रतीक्षा असते. कळत्या वयापासून आरती भजनाचा ठेका जमू लागला. महाविद्यालयीन जीवनात कोल्हापूर येथे असतानाही गणेशोत्सवात कुडणे येथे येण्याची ओढ असायची. त्यावेळी गणेशोत्सवाच्या निमित्ताने पूर्ण वाड्यावर एक फेरी पूर्ण व्हायची. गणेशोत्सव हा सर्वांना एकत्र आणणारा उत्सव आहे. दरम्‍यान, मुख्यमत्र्यांच्या श्री गणपतीचे दीड दिवसाने विसर्जन झाले.

जनतेच्‍या कल्‍याणासाठी केली प्रार्थना

आम्‍ही भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करतो. कितीही काम असले तरी या दोन दिवसांत घरीच थांबतो. मुख्यमंत्री झाल्यापासून शुभेच्छा देणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी त्याआधीपासून नियमितपणे येणारे अनेकजण आहेत. श्री गणरायावर माझी नितांत श्रद्धा आहे. राज्याच्या जनतेच्या कल्याणासाठी देवाचा आशीर्वाद महत्वाचा आहे, असे मुख्‍यमंत्री सावंत म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com