
पणजी : फिटनेस आयकॉन म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता मिलिंद सोमण याने मुंबई ते गोवा असे ५५८ किलोमीटरचे अंतर सायकल आणि धावत पार केले. त्याने दररोज ९० किलोमीटर सायकलिंग आणि २१ किलोमीटर धावत ही मोहीम फत्ते केली. मिलिंदच्या या कामगिरीचे चाहत्यांनी प्रचंड कौतुक केले आहे. समाज माध्यमावर मिलिंदचे व्हिडिओ आणि त्याच्या सायकलिंगचे रिल्स व्हायरल झाले. गोव्यातून सायकल चालवताना मिलिंद गोव्याच्या निसर्गाचे कौतुकही केले आहे.
२६ जून रोजी सुरू झालेली ही धाव कोकण किनाऱ्यावरील निसर्गरम्य पण शारीरिकदृष्ट्या कठीण भूभागातून पेण, कोलाड, चिपळूण, रत्नागिरी आणि कणकवली या प्रदेशांमधून जात आज गोव्यात संपली. या प्रवासात मिलिंदने फिटनेस, मानसिक ताकद आणि एकतेचा एक शक्तिशाली संदेश दिला. हजारो लोकांना दैनंदिन आरोग्य आणि सातत्यपूर्ण शिस्तीचे तत्वज्ञान स्वीकारण्यास प्रेरित केले.
यासंदर्भात, मिलिंद सोमण म्हणाला, की १०० किलोमीटर सायकलिंग आणि २१ किलोमीटर धावणे आणि तरीही ते फक्त शारीरिक आव्हानांबद्दल नाही. लोकांना निरोगी मानसिकता स्वीकारण्यास, मानसिक लवचिकता निर्माण करण्यास आणि एकतेकडे एकत्र येण्यास प्रेरित करणे. मी टेकड्यांवरून सायकल चालवत असलो किंवा कोकण किनाऱ्यावर अनवाणी चालत असलो तरी, साधेपणा, लोक आणि सामायिक ऊर्जा मला पुढे नेत आहे."
गोव्यासारख्या निसर्गरम्य ठिकाणाहून सायकलिंगचा अनुभव हा अविस्मरणीय असा असतो. निसर्गाची देणगी मिळालेल्या या राज्यातील लोकांनी फिट राहण्यासाठी नियमित व्यायाम करावा, असा सल्ला मी यावेळी देतो. - मिलिंद सोमण
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.