Goa Assembly Election 2027: युगोडेपात घराणेशाहीला कोणतेही स्थान नाही! मिकी पाशेको बाणावलीतून लढणार निवडणूक

micky pacheco benaulim constituency candidate: आगामी विधानसभा निवडणूक आपण नुवेऐवजी बाणावली मतदारसंघातून लढविणार असल्याचे मिकी पाशेको यांनी जाहीर केले.
micky pacheco benaulim constituency candidate
micky pacheco benaulim constituency candidateDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: काँग्रेसचे प्रवक्ते अमित पालेकर यांनी भाजपच्या मदतीने काँग्रेसची मते फोडण्यासाठी प्रादेशिक पक्षाचे पुनरुज्जीवन केले जात असल्याचा आरोप केला होता. तिसवाडीतील एक मंत्री आणि बार्देशमधील एक आमदार या पक्षातून निवडणूक लढविणार असल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यावरून बाबूश मोन्सेरात आणि मायकल लोबो यांची नावे चर्चेत आली होती.

गोमन्तक टीव्हीवरील ‘साश्‍‍टीकार’ कार्यक्रमात बोलताना पाशेको यांनी हे आरोप फेटाळले. युगोडेपात घराणेशाहीला स्थान नसेल. त्यामुळे आपली माजी पत्नी व्हियोला पाशेको याही निवडणूक लढविणार नसल्याचे त्यांनी स्‍पष्‍ट केले.

micky pacheco benaulim constituency candidate
Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

काँग्रेसची (Congress) मते विभागली गेल्यास त्याला काँग्रेसच जबाबदार असेल, असे सांगून पाशेको म्हणाले की, प्रत्येक मतदारसंघात काँग्रेसने अनेक इच्छुक तयार ठेवले आहेत. उमेदवारी न मिळाल्यास त्यांच्यात बंडखोरी होण्याची शक्यता असून, त्याचा फटका काँग्रेसला बसेल. गोव्यात प्रादेशिक मुद्द्यांना प्राधान्य देणारा आणि केंद्रीय नेतृत्वाच्या हस्तक्षेपापासून राज्याच्या हिताचे संरक्षण करणारा प्रबळ प्रादेशिक पक्ष उभा करणे, हा युगोडेपाच्या पुनरुज्जीवनामागील उद्देश आहे. सध्या दहा मतदारसंघांत उमेदवार तयार असल्याचेही पाशेको यांनी सांगितले.

micky pacheco benaulim constituency candidate
Goa Assembly Election 2027: 'मी निवडणूक लढवणारच!', हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकरांनी ठोकला शड्डू; लोबोंसमोर आव्हान

मिकी पाशेको बाणावलीतून लढणार

आगामी विधानसभा निवडणूक आपण नुवेऐवजी बाणावली मतदारसंघातून लढविणार असल्याचे मिकी पाशेको यांनी जाहीर केले. नुवेतील कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय कळविल्याचे त्यांनी सांगितले. नुवेतून योग्य उमेदवार उभा केला जाईल, असेही ते म्हणाले.युगोडेपाच्या नव्या कार्यकारिणीत राधाराव ग्रासियस, आनाक्लेत व्हिएगस आणि श्रवण दुभाषी हे जुने पदाधिकारी आहेत. अन्य सदस्य नव्याने नियुक्त करण्यात आले असून, त्यांपैकी दहा जण वकील असल्याची माहिती पाशेको यांनी दिली.

micky pacheco benaulim constituency candidate
Goa Assembly: एनडीझेडचा प्रश्न नाकारल्याने विरोधकांचा गोंधळ, 6 आमदार आक्रमक; युरी, बोरकरांना मार्शल्सनी विधानसभेतून काढले बाहेर

नव्या पक्षामागे भाजपचाच हात : काँग्रेस

युगोडेपाच्या पुनरुज्जीवनामागे भाजपचा हात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पुन्हा केला. काँग्रेसच्या मतांची विभागणी करून त्याचा फायदा भाजपला मिळवून देणे, हा या राजकीय खेळीमागील उद्देश असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे युगोडेपाच्या पुनरुज्जीवनावरून काँग्रेस आणि मिकी पाशेको यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com