गोव्याबाहेरील राजकीय पक्षाचा गोव्यात 'धुडगूस'

दोन पक्षांना अदानी बहुराष्ट्रीय उद्योग समूह आर्थिक मदत करीत असल्याचा आरोप माजी आमदार व कॉंग्रेस पक्षाचे नेते मिकी पाशेको यांनी काल मडगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
Mickey Pashko

Mickey Pashko

Dainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: गोव्याबाहेरचे राजकीय पक्ष सध्या गोव्यात येऊन धुडगूस घालत आहेत. कॉंग्रेस पक्षातील आमदारांना व नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी लाखो - करोडो रुपयांची आमिषे दाखवित आहेत. त्यास काही आमदार व नेते बळीही पडले. मात्र, या पक्षांकडे एवढी मोठी रक्कम आली कुठून हा प्रश्र्न गोमंतकीयांना पडत आहे. या दोन पक्षांना अदानी बहुराष्ट्रीय उद्योग समूह आर्थिक मदत करीत असल्याचा आरोप माजी आमदार व कॉंग्रेस पक्षाचे नेते मिकी पाशेको यांनी काल मडगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

<div class="paragraphs"><p>Mickey Pashko</p></div>
Goa Election: 'नकारात्मक शक्तींनी देशाचा पाया कमकुवत केला'

अदानीचे गोव्यात अनेक प्रकल्प सुरू असून हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांना भारतीय जनता पक्षाचे (BJP) सरकार येथे हवे आहे. भाजप म्हणजे अदानी व अदानी म्हणजे भाजप हे समीकरण सर्वश्रुत आहे, असेही पाशेको यांनी सांगितले. गोव्याबाहेरील पक्षांना आपले सरकार गोव्यात सत्तेवर येणार नाही याची पूर्ण कल्पना आहे. मात्र, त्यांचा कॉंग्रेस पक्षाच्या मतांचे विभाजन करण्याचा डाव आहे. त्यामुळे भाजप सरकार सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा होईल असे त्यांना वाटते. त्यामुळे गोवेकरांनी या दोन्ही पक्षांपासून सतर्क रहावे, असा इशाराही मिकी पाशेको यांनी दिला आहे.

या पक्षांचे नेते केवळ कॉंग्रेसवर (Congress) टीका करताना दिसतात. सत्तेवर असलेल्या भाजपवर नाही. यावरून लोकांनी काय तो अर्थ काढावा असेही मिकी पाशेको म्हणाले. अदानींचे प्रकल्प कॉंग्रेस पक्षाच्या राजवटीतच सुरू झाले असे विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले, की आपण तेव्हा कॉंग्रेस पक्षात नव्हतो. जर असतो, तर विरोधच केला असता.

<div class="paragraphs"><p>Mickey Pashko</p></div>
नाताळ अन् मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक गोव्यात दाखल; रहदारीचा वाढला ताण

‘रेजिनाल्ड यांनी पैशांसाठी कॉंग्रेस पक्ष सोडला’

रेजिनाल्ड यांनी कॉंग्रेस पक्ष सोडून केवळ पैशांच्या हव्यासापोटी तृणमूल पक्षात प्रवेश केला हे सर्व कुडतरकरांना माहीत झाल्याचे मिकी पाशेको (Mickey Pashko) यांनी सांगितले. जो माणूस राहुल गांधी व नंतर प्रियांका गांधी यांच्या बैठकांमध्ये, सभांमध्ये विरोधी पक्षांवर टीका करत होता. तो केवळ आठच दिवसांनंतर कॉंग्रेस विरोधी कसा होऊ शकतो? याचेच आपल्याला आश्र्चर्य वाटते. जेव्हा त्यांनी भाजप, आम आदमी पक्षाच्या नेत्यांबरोबर गुप्त बैठका सुरू केल्या होत्या, तेव्हा मीच कॉंग्रेस श्रेष्ठींना त्याची कल्पना दिली होती, असेही पाशेको यांनी सांगितले. दोन महिन्यांपूर्वी तृणमूल कॉंग्रेसचे नेते आपल्याला भेटले होते व त्यांनी आमिषही दाखविले होते, असेही मिकी यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com