Goa Election: मायकल लोबो यांचे ‘मांद्रे’वर लक्ष

Goa Election: पुत्र डॅनियलसाठी: मुख्यमंत्र्यांचा आरोलकरांवर वरदहस्त
michael lobo
michael loboDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Election: कळंगुटला लागून असलेल्या शिवोली मतदारसंघानंतर आता शिवोलीला लागून असलेल्या शापोरा नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरील मांद्रे मतदारसंघाकडे मायकल लोबो यांनी लक्ष वळवले आहे. त्यांनी या मतदारसंघात आपल्या हितचिंतकांची बांधणी सुरू केली आहे. या मतदारसंघातून त्यांचे पुत्र डॅनियल हे निवडणूक लढवू शकतात.

michael lobo
CM Pramod Sawant: काँगेसमधून विजयी होणारे नेते नंतर BRS मध्ये जातील; प्रमोद सावंत यांचा अंदाज

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर हे अचानकपणे सक्रिय होण्याची कारणमीमांसा केली असता ही धक्कादायक माहिती हाती आली. सध्या आरोलकर यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा वरदहस्त लाभला आहे. त्यांनी नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे यांच्याशी उघड संघर्ष पत्करला होता.

राणे यांनी तर आरोलकर यांचे बेकायदा फार्महाऊस मोडून टाकतो, अशी जाहीर घोषणा केली होती. तरीही आरोलकर यांचे म्हणणे अगदी लोकांच्या गराड्यात मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतले. आरोलकर यांच्या आंदोलनाच्या परिणामांची माहिती दिल्लीपर्यंत पोचण्याची व्यवस्था परस्पर केली गेली आणि पेडण्याचा विभागीय नियोजन आराखडा रद्द करण्याची घोषणा करण्याची वेळ सरकारवर आली.

michael lobo
Goa Government: ‘दयानंद’साठी आधार लिंक करा!

त्यानंतर आता कुळ-मुडकारांचा प्रश्न आरोलकर यांनी हाती घेतला आहे. त्याविषयी मांद्रेत पत्रकार परिषद घेतल्यावर दुसऱ्याच दिवशी ते मुख्यमंत्र्यांना भेटले आणि कुळ मुंडकार खटल्यांसाठी अतिरिक्त मामलेदार नेमण्याचे आश्वासन त्यांनी मिळवले.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवेळी याचा होईल, तेवढा फायदा करून घेतला जाणार आहे. प्रादेशिक नियोजन आराखडा प्रश्नी माजी आमदार दयानंद सोपटे हे आरोलकर यांच्याविरोधात स्थानिक पातळीवर फारसे प्रभावी ठरले नाहीत, असे भाजपच्या काही नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे आरोलकर हे पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपचे मांद्रेतील उमेदवार असतील, असे गृहीत धरून त्यांना बळ द्यायचे, अशी रणनीती आकाराला आणण्यात आली आहे.

आधार कार्डसाठी मोहीम

याशिवाय मांद्रे मतदारसंघात वास्तव्यास असलेले पण मतदार यादीत नोंद नसलेल्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यांची मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी आधार कार्डे तयार करण्यासाठी मोहीम राबवण्यात आली आहे. यात अनेकांची आधार कार्डे म्हापशात तयार झाली आहेत. त्यांची नावे आता आधार कार्डांच्या आधारे मतदार यादीत समाविष्ट केली जाणार आहेत. त्यासाठी काही जणांवर ही जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com