जनतेचे प्रश्‍‍न आक्रमकपणे मांडणार : मायकल लोबो

लोबोंनी विधानसभेत जाऊन विरोधीपक्षाच्या गटनेतेपदाचे सोपस्‍कार केले पूर्ण
Michael Lobo
Michael LoboDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : जनतेने दिलेला कौल काँग्रेस पक्षाने मान्‍य केला असून त्‍यांचे प्रश्‍‍न, समस्‍या तितक्‍याच आक्रमक पद्धतीने विधानसभेत आणि विधानसभेबाहेर मांडले जातील, अशी माहिती विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी दिली. काँग्रेस विधीमंडळ गटनेतेपदी निवड झालेल्‍या मायकल लोबो यांनी प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर यांच्‍यासह विधानसभेत जाऊन गटनेतेपदाचे सोपस्‍कार पूर्ण केले. सभापतींच्‍या नावे असलेले पक्षाचे पत्र प्रदेशाध्‍यक्ष पाटकर यांनी सचिव नम्रता उलमन यांच्‍याकडे सादर केले. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. प्रदेशाध्‍यक्ष पाटकर, मुख्‍य व्‍हिप आमदार कार्लुस परेरा, केदार नाईक, युरी आलेमाव यांची यावेळी उपस्‍थिती होती.

Michael Lobo
सुदिन ढवळीकरांना 'पॉवर'फुल खातं मिळणार?

विधानसभा निवडणुकीत बहुमत न मिळविता आलेला काँग्रेसने (Congress) पक्षाची जबाबदारी नव्‍या दमाच्‍या युवा तडफदार नेत्‍यांवर सोपविली आहे. विधानसभेतील पक्षाची भूमिका आणि जनतेचे प्रश्‍‍न तितक्‍याच आक्रमक पद्धतीने मांडले जावेत यासाठी विरोधी पक्षनेतेपदी कळंगुटचे आमदार मायकल लोबो (Michael Lobo) यांच्‍यावर जबाबदारी सोपविली आहे. या पदासंबंधीचे सोपस्‍कार लोबो यांनी आज पूर्ण केले. काँग्रेस येत्‍या काळात विरोधी पक्षाची भूमिका अत्‍यंत आक्रमकपणे अभ्‍यासू पद्धतीने निभावेल, असे लोबो यांनी सांगितले.

Michael Lobo
मोपा लिंक रोडच्या कामाला पंचायत संचलनालयाचा हिरवा कंदील

खातेवाटप जाहीर झाल्‍यानंतर आज पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि सहकार व जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी मंत्रालयातील आपल्‍या‍ कार्यालयात जाऊन मंत्रिपदाचा ताबा घेतला. खंवटे यांनी पर्यटन हा राज्‍याचा मुख्‍य आर्थिक स्रोत असल्‍याने 25 वर्षांचा रोड मॅप तयार करणार असल्‍याचे सांगत पर्यटन अधिक चांगल्‍या प्रकारे वाढविण्‍यासाठी प्रयत्‍न करणार असल्‍याचे सांगितले. तर, शिरोडकर म्‍हणाले की, गोव्‍यात (Goa) अनेक ठिकाणी पिण्‍याच्‍या पाण्‍याचा प्रश्‍‍न कायम आहे. लवकरच यासाठी ठोस उपाययोजना केल्‍या जातील, जेणेकरून राज्‍यातील जनतेला पाणी मुबलक उपलब्‍ध होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com