Michael Lobo : लोबो म्हणतात, खंडणीचा विषय संपला!

माध्यमांच्या प्रश्नांवर मौन : माजी आमदार फर्नांडिस यांचीच चौकशी करा
Michael Lobo
Michael Lobo Dainik Gomantak

राज्यातील हॉटेल व्यावसायिकांकडून खंडणी मागितली जात असल्याच्या आरोपांवरून सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच, कळंगुटचे आमदार मायकल लोबोंनी या कथित खंडणी प्रकरणाचा विषय संपलेला आहे, अशी प्रतिक्रिया देत यावर अधिक बोलणे टाळले.

सत्ताधारी पक्षातील लोबोंच्या खंडणी आरोप केल्यानंतर सध्या सर्वत्र खळबळ माजली आहे. अशातच, या प्रकरणात लोबोंची तपास यंत्रणांनी चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी केली आहे.

यावर हडफडे येथे माध्यमांशी संवाद साधताना लोबो म्हणाले की, ‘या प्रकरणाचा विषय आता संपलेला आहे. माजी आमदार हे संपलेल्या विषयावर प्रसिद्धीसाठी बोलत आहेत. किनारीपट्ट्यातील मी आमदार असून आपले कान व डोळे हे नेहमीच उघडे असतात.

Michael Lobo
Goa Accident: वास्कोत कारची दुचाकीला धडक, महिलेचा मृत्यू तर, काणकोण येथील अपघातात एकजण ठार

आम्ही सक्रिय लोकप्रतिनिधी आहोत. सर्वप्रथम आम्हीच यावर आवाज उठविला होता. मात्र, आता हा प्रकार संपलेला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कथित खंडणीप्रश्नी वक्तव्य केले आहे. अशावेळी मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर आम्ही भाष्य करणे उचित ठरणार नाही’, असे म्हणत लोबोंनी स्पष्टीकरण देणे टाळले.

या कथित खंडणीच्या विषयाचे निराकरण झाले का? असे विचारले असता त्यांनी ‘हा विषय संपलेला आहे’, असे वारंवार म्हणत काढता पाय घेतला.

नक्कीच गौडंबगाल : काँग्रेस

लोबोंच्या या वक्तव्यावर काँग्रेस आमदार कार्लुस फरेरा यांनी टीका केली. ‘लोबो यांनी स्वत:च खंडणी सुरू असल्याचे स्पष्टपणे सांगून हा मुद्दा उपस्थित केला असताना हे प्रकरण बंद झाल्याचा दावा ते कसा करू शकतात? या रॅकेटचा मुद्दा हलक्यात घेऊ नये. हा विषय बंद झाल्याचा दावा करणाऱ्यांना काहीतरी लपवायचे आहे, असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com