Vasco Accident: वास्कोत कारची दुचाकीला धडक, महिलेचा मृत्यू तर, काणकोण येथील अपघातात एकजण ठार

राज्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे. मागील 24 तासांत दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे
Vasco Accident
Vasco Accident Dainik Gomantak

Vasco Accident: राज्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे. मागील 24 तासांत दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. हुबळीहून मडगावच्या दिशेने जात असताना वीज खांबाला धडकून कारचालकाचा मृत्यू झाला आहे.

तर, शांतीनगर, वास्को येथे झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे. कारने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला.

हुबळीहून मडगावच्या दिशेने येताना मंजूनाथ हेबसूर (वय 43) या इसमाच्या कारचा अपघात झाला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला असून, त्याच्या सोबत असणाऱ्या अक्षय अमगेर हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.

वास्को येथील अपघातात रिना देवी सैनी (वय 38) या महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघातात महिलेचा पती आणि मुले जखमी झाली आहेत. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास शांतीनगर महामार्गावर हा अपघात झाला. महिला दुचाकीवर मागे बसली होती.

Vasco Accident
Viral Video: खलिस्तान समर्थकांचा लंडनमध्ये राडा, तिरंग्याचाही केला अपमान

शांतीनगर येथील केंद्रीय विद्यालयाजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव येणाऱ्या कारने धडक दिली. यामुळे महिलेसह सर्वजण रस्त्यावर कोसळले. शेजारीच पार्क केलेल्या ट्रकवर महिला आदळल्याने महिला गंभीर जखमी झाली. महिलेला रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, तिला मृत घोषित करण्यात आले.

या अपघातात महिलेचा पती आणि मुले देखील जखमी झाली असून, त्यांच्यावर देखील उपचार करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी कारचालक लिंगप्पा कोलकर (वय 28) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com