स्वगृही परत या: मायकल लोबो

सोडून गेलेल्यांना आवाहन: पाटकरांनी स्वीकारली प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे
Michael Lobo
Michael Lobo Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कोणत्याही निवडणुकांत उमेदवार ठरवण्याचा अधिकार प्रदेश काँग्रेसला असायला हवा. दोन वर्षे आधी उमेदवार निश्चित करून काम सुरू केल्यास निवडणुकांत पक्षाचा विजय निश्चित होऊ शकतो. काँग्रेसने उमेदवारी देण्यास उशीर केला त्याचा फटका उमेदवारांना प्रचार करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणण्यास नव्या प्रदेश काँग्रेस समिती टीमने प्राधान्य द्यावे, असे मत विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी व्यक्त केले.

Michael Lobo
श्रीरामनवमीच्या शोभायात्रेवर वास्कोत दगडफेक!

पणजीतील ग्रीन एकर्स येथे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्याकडे पदाची सूत्रे सोपविण्याचा कार्यक्रम प्रदेश काँग्रेस समितीने आयोजित केला होता. माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे तसेच पक्षाचा झेंडा अमित पाटकर यांच्याकडे सोपविला. यावेळी व्यासपीठावर गोव्याचे ज्येष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम, गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, विरोधी पक्षनेते मायकल लोबो, आमदार दिगंबर कामत, आमदार रुदॉल्फ फर्नांडिस, आमदार केदार नाईक, आमदार दिलायला लोबो, आमदार राजेश फळदेसाई, आमदार कार्लोस फेरेरा, आमदार अल्टन डिकॉस्ता, पक्षाचे कार्याध्यक्ष युरी आलेमाव, पक्षाचे युवा अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर, प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा बिना नाईक, डॉ. प्रमोद साळगावकर उपस्थित होते.

अमित पाटकर म्हणाले की, काँग्रेसच्या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला तरी काँग्रेसने निवडणुकीवेळी कोणतीच हार पत्करली नाही तर त्याच जोमाने निवडणूक लढविली. काँग्रेमधील 17 पैकी 1 आमदार शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहिला. अशा या कठीण परिस्थितीतही आमदारांची संख्या 1 वरून 11 वर नेली. या पक्षाला मजबूत करण्यासाठी तसेच चांगले दिवस आणण्यासाठी शंभर टक्के योगदान देणार आहे व 2027 मध्ये राज्यात काँग्रेसचे बहुमताचे सरकार आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्‍वासन पाटकर यांनी दिले.

जे नेते व कार्यकर्ते पक्ष सोडून गेले आहेत त्यांनी पुन्हा पक्षात परतावे. पक्षाच्या गट व बूथस्तरावरील अनेकजण काँग्रेसमधून निवडणुकीच्या तोंडावर गेले त्यांनी पक्षात येऊन हा पक्ष अधिक मजबूत करावा. आलेक्स रेजिनाल्ड हे आता अपक्ष आमदार आहेत. ते ज्या स्तरावरचे नेते आहेत त्याचा मान राखून त्यांना पुन्हा पक्षात येण्यासाठी मनमिळवणी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही लोबो यांनी सांगितले.

निवडणुकीत जय - पराजय हा अटळ असतो. त्यामुळे आकड्यांच्या खेळामध्ये जो जिता वही सिकंदर हे आम्ही मान्य केले पाहिजे. या पक्षामधील युवा नेत्यांच्या हाती पक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Michael Lobo
काँग्रेसची कमान युवा पिढीवर: पी. चिदंबरम

सरदेसाई हे पूर्वीचे कॉंग्रेस नेते: काँग्रेसबरोबर युती केलेले गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांनी काँग्रेसमध्ये यावे की पक्षाबरोबर राहावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्‍न आहे. गोवा फॉरवर्ड पक्ष स्थापन करण्यापूर्वी ते पूर्वीचे काँग्रेसचे नेते आहेत. त्यामुळे जे नेते काही कारणामुळे काँग्रेसला सोडून गेले त्या सर्वांना बरोबर घेऊन हा पक्ष अधिक सक्षम व बळ वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल, त्यामुळे पक्ष सोडून गेलेल्यांनी स्वगृही परत यायला हवे, असे उत्तर विरोधी पक्षनेते लोबो यांनी या सभेनंतर पत्रकारांना दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com