Mhaje Ghar: 'माझे घर'चे अर्ज सोमवारपासून उपलब्ध; योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा, CM प्रमोद सावंतांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Mhaje Ghar Scheme: ‘माझे घर’ योजनेची राज्यभरात जोरात अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उपजिल्हाधिकारी व मामलेदारांच्या बैठकीत सूचना केल्या.
Mhaje Ghar
Mhaje GharDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : ‘माझे घर’ योजनेची राज्यभरात जोरात अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उपजिल्हाधिकारी व मामलेदारांच्या बैठकीत सूचना केल्या. बैठकीत कोमुनिदाद प्रशासकांनाही सहभागी करून कोमुनिदाद जमिनींवरील घरे नियमित करण्यासाठी सरकार गंभीर असल्याचा संदेश सरकारने दिला आहे. तसेच या योजनेचे अर्ज सोमवारपासून सरकारी कार्यालयात उपलब्ध करण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मंत्रालयातील या बैठकीस महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, महसूल सचिव संदीप जॅकीस, उत्तर व दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी, पंचायत संचालनालय व पालिका संचालनालयाचे संचालक, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Mhaje Ghar
Goa Coconut: नारळ पीक का घटले? शुक्रवारी होणार चिंतन; 'गोमन्‍तक', 'ॲग्रोवन'तर्फे दोनापावला येथे राष्‍ट्रीय परिषदचं आयोजन

आनंदाचा निर्देशांक वाढेल

मुख्यमंत्री म्हणाले, ‘माझे घर’ ही योजना गोमंतकीयांच्या आयुष्यात आनंद निर्देशांक वाढविणारी ठरेल. पाडकामाच्या भीतीने त्रस्त अनेकांना त्यांच्या स्वतःच्या घरात निर्धास्तपणे राहण्याचा दिलासा या योजनेतून मिळेल. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व महसूल अधिकारी आणि प्रशासकांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले.

Mhaje Ghar
Goa Crime: पणजीत खळबळ! बसस्थानकाजवळ आढळला छत्तीसगडच्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा : महसूल विभाग आणि संबंधित सर्व अधिकारी मिळून या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवतील, यासाठी समन्वयाने काम केले जाईल. अधिकाऱ्यांना जागृती वाढवून ही योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com