MGP Goa: ‘बालाजी’नंतर आता भाटीकर? ‘मगोला’ धक्का बसण्याची फोंड्यात चर्चा

MGP Goa: भाजप रणनीतीचा पुढील भाग म्हणून ते फोंड्यातील मगोचे नेते डॉ. केतन भाटीकर यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ शकतात, अशी चर्चा सध्या फोंड्यात सुरू आहे.
Goa MGP
Goa MGP Dainik gomantak
Published on
Updated on

Maharashtrawadi Gomantak Party Goa

सावर्डे मतदारसंघातील मगो पक्षाचे गेल्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवार विनायक ऊर्फ बालाजी गावस यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन भाजपने मगोला जबरदस्त धक्का दिला आहे.

आता याच रणनीतीचा पुढील भाग म्हणून ते फोंड्यातील मगोचे नेते डॉ. केतन भाटीकर यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ शकतात, अशी चर्चा सध्या फोंड्यात सुरू आहे.

गावस यांना गेल्या निवडणुकीत सावर्डे मतदारसंघातून ३,७६८ मते मिळाली होती व त्यांची तिसऱ्या क्रमांकावर वर्णी लागली होती. बालाजी हे सावर्डे मतदारसंघातील मगो पक्षाचे एक बलाढ्य नेते म्हणून गणले जात असल्यामुळे त्यांचे पक्षाला त्यागणे हा मगोसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.

वास्तविक मगो पक्ष भाजप सरकारचा एक घटक असल्यामुळे या त्यांच्या रणनीतीमागचे नेमके आकलन होत नसले तरी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आपली शक्ती वाढवण्याच्या मूडमध्ये असल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. दक्षिण गोव्याच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांना जास्तीत जास्त आघाडी मिळवून देण्याची तयारी भाजप करत आहे.

सध्या फोंड्यातील डॉ. केतन भाटीकर मगो पक्षात असले तरी ते स्वतंत्रपणे कार्य करताना दिसत आहेत. गेल्या वर्षी झालेल्या फोंडा नगरपालिका निवडणुकीत त्यांनी आपला स्वतंत्र पॅनल रिंगणात उतरवून चार प्रभागांत विजय मिळवला होता.

यामुळे ते ठळकपणे नजरेत आले होते. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांशी असलेली त्यांची जवळीक बोलकी असून भाटीकरही त्याला दुजोरा देतात. गेल्या डिसेंबर महिन्यात भाटीकरांच्या घरी आकस्मिकरीत्या भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

असे असले तरी भाटीकरांचा व फोंड्याच्या स्थानिक भाजप नेतृत्वामध्ये होणारा संघर्ष मात्र अधोरेखित होतच असतो.

Goa MGP
Goa Mango & Vegetable Prices: गोव्याचा मानकुराद खातोय भाव; लिंबू, फळेही महागली, गावठी भाज्यांना वाढती मागणी

भविष्यातील सूचना

सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराकरिता उतरलो नसलो तरी आपले कार्य सुरूच आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी विनंती केल्यास आपल्याला भाजप उमेदवाराचा प्रचार करावा लागेल हे सांगायला भाटीकर विसरले नाहीत. आता यातून भविष्याची नांदी सूचित होते की काय, हे मात्र बघावे लागेल.

भाजपची शक्ती वाढविण्याचा प्रयत्न

मगो पक्ष सरकारात असूनही फोंड्यातील अनेक समस्यांविरुद्ध आवाज उठवून भाटीकर आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, स्थानिक आमदार रवी नाईक, फोंड्याचे भाजप गटाध्यक्ष विश्वनाथ दळवी हे भाटीकरांच्या भाजप प्रवेशाला विशेष अनुकूल नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

पण, मुख्यमंत्र्यांच्या ‘गुड बुक्स’मध्ये असल्यामुळे तसेच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपची शक्ती वाढवून, श्रेष्ठींना खुश करण्याच्या धोरणामुळे फोंड्यात सध्या स्वतंत्र शक्ती म्हणून वावरत असलेल्या भाटीकरांना प्रवेश देऊन भाजप बालाजींपाठोपाठ मगोला आणखी एक मोठा धक्का देऊ शकतात, असा होरा राजकीय विश्लेषक मांडत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com