IMD: समुद्रात वादळी वाऱ्याची शक्यता; मासेमारी ठप्प

हवामान खात्याच्या सुचनेनंतर बोटी पुन्हा समुद्रात उतरवणार
storm in sea
storm in seaDainik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा: हवामान खात्याने समुद्रात वादळाचा धोका असल्याचे सूचित केले आहे. यामुळे दक्षिण गोव्यातील पारंपारिक व्यावसायिकांनी मासेमारी करण्यासाठी आपल्या बोटी समुद्रात न उतरविता किनाऱ्यावर आणून ठेवल्या आहेत.

(Meteorological department has predicted storm in sea fishing has stopped in South Goa)

storm in sea
'Sill Soul Cafe: प्रकरणात स्मृती इराणी यांनी देशाची माफी मागावी'

हवामान खात्याने तीन दिवस दिवसापूर्वी हा अंदाज व्यक्त केला असून हवामान खात्याच्या सुचनेनंतर या बोटी पुन्हा समुद्रात उतरविण्यात येणार असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. मात्र, यामुळे मासेमारी व्यवसाय ठप्प झाला आहे. यात मोसेमारी व्यवसायिकांना नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

storm in sea
'काँग्रेसला देशाचे तुकडे करण्याची सवयच...': Chief Minister प्रमोद सावंत

बाणावली येथील मासळीमारी बोट व्यवसायिक पेले आणि क्रिस्टो फर्नांडिस यांनी सांगितले, की सध्या समुद्र खळलेला आहे. या बरोबरच हवामान खात्याने सूचित करून 14 ते 15 सप्टेंबरपर्यंत मासेमारी बोटी समुद्रात न उतरविण्यासाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

त्यामुळे मागील तीन-ते चार दिवसांपासून समुद्रात बोटी उतरविल्या नाहीत. दक्षिण गोव्यातील प्रमुख मासेमारीचे व्यवसायाचे ठिकाण असलेल्या कुटंबंण जेटीवरील सर्व बोटी धक्य्यांवर नांगरून ठेवण्या आल्या असल्याचे कुटंबंण फिशरीस को ऑप सोसायटीचे चेरमन विनय तारी यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com