'काँग्रेसला देशाचे तुकडे करण्याची सवयच...': Chief Minister प्रमोद सावंत

Chief Minister Pramod Sawant: काँग्रेसला देशाचे तुकडे करण्याची सवय आहे.
Chief Minister Pramod Sawant
Chief Minister Pramod SawantTwitter/ @ANI
Published on
Updated on

Chief Minister Pramod Sawant: काँग्रेसला देशाचे तुकडे करण्याची सवयच आहे. आपल्या देशाचा इतिहास पाहा, त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी भारताचे तुकडे करुन पाकिस्तानची निर्मिती केली. आरएसएसचा गणवेश जाळून ते भाजप आणि आरएसएसला टार्गेट करत आहेत. भाजप आणि आरएसएस नेहमीच ‘भारताला एकसंध’ ठेवण्यासाठी लढले, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरएसएस (RSS) आणि भाजपवर केलेल्या द्वेषपूर्ण आरोपावर आरएसएसचे सहसंघ कार्यवाह मनमोहन वैद्य यांनीही काँग्रेसवर (Congress) जोरदार प्रहार केला. मनमोहन वैद्य प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, 'द्वेषपूर्ण भाषणाने देश जोडला जाणार नाही. राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) आजोबांनी संघाला रोखण्याचा प्रयत्न केला होता. परंतु संघ अविरथपणे देशासाठी लढत राहीला. त्यांनी अनावश्यक निर्बंध संघावर लादले होते.'

Chief Minister Pramod Sawant
Chief Minister Yogi Adityanath: योगींना जीवे मारण्याची धमकी देणारा गजाआड

विशेष म्हणजे, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु आहे. कन्या कुमारी येथून सुरु झालेला हा प्रवास 5 महिन्यानंतर काश्मीरमध्ये संपेल. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी सातत्याने आरएसएस आणि भाजपवर देशात द्वेष पसरवून समाजात फूट पाडत असल्याचा आरोप करत आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियावर काँग्रेसने आरएसएस आणि भाजपला घेरले आहे. आज काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन खाकी हाफ पँट जाळण्यात आली. देशाला द्वेषाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी आणि भाजप-आरएसएसने केलेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी पोस्टमध्ये लिहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com