Mayem: ट्रान्सफॉर्मरने पेट घेतला, 10 तास वीज गायब; मये परिसरात दिवसभर लोकांचे हाल

Mayem Light Issue: मये येथील विजेचा ट्रान्सफॉर्मर जळाल्याने मोठी वीज समस्या निर्माण झाली असून, (रविवारी) मये गावासह परिसरातील काही भागांत जवळपास दहा तास वीजपुरवठा बंद होता.
Goa smart electricity meter
Goa smart electricity meterDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: मये येथील विजेचा ट्रान्सफॉर्मर जळाल्याने मोठी वीज समस्या निर्माण झाली असून, (रविवारी) मये गावासह परिसरातील काही भागांत जवळपास दहा तास वीजपुरवठा बंद होता. त्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय झाली.

उपलब्ध माहितीनुसार, आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा ट्रान्सफॉर्मर जळण्याचा हा प्रकार घडला. नवीन ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था होईपर्यंत नार्वे फिडरवरून वीजपुरवठा करण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती काही स्थानिकांकडून मिळाली.

मयेतील अर्धवाडा येथील ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक बिघाड होताच ट्रान्सफॉर्मरने पेट घेतला, असे स्थानिकांनी सांगितले. वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन उपाययोजना केली. त्यामुळे या दुर्घटनेत अन्य कोणताही अनर्थ घडला नाही.

Goa smart electricity meter
Mapusa Electric Shock: 'आमच्या जीवासोबत खेळ!' म्हापसा मार्केटमध्ये एकाला विजेचा धक्का; दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण

मात्र, वीज ट्रान्सफॉर्मर जळताच अर्धवाडा, जांभूळभाट आणि केळबायवाडा भागातील वीजपुरवठा बंद झाला. दुपारपर्यंत वीज बंद होती. वीजपुरवठा सुरळीत करेपर्यंत जवळपास दहा तास वीज नव्हती. त्यामुळे लोकांचे विशेष करून गृहिणींचे हाल झाले. वीजपुरवठा सुरू होताच घरातील पंखे सुरू नसल्याने घामाघूम झालेल्या लोकांना मोठा दिलासा मिळाला.

Goa smart electricity meter
Sattari Light Issue : सत्तरीत नागरिकांच्या आक्रमकतेनंतर रातोरात वीज सेवा पूर्ववत; नेहमीचीच समस्या

व्यवसाय-उद्योगांनाही फटका

ट्रान्सफॉर्मर जळताच स्थानिक आमदार प्रेमेंद्र शेट यांनी त्वरित हालचाल करून वीज पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करा, अशी सूचना वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांना केली. मात्र, नवीन वीज ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था करण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याने सध्या जवळपासच्या नार्वे गावातून वीज पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वीज पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली असली, तरी नवीन ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था होईपर्यंत वॉशिंग सेंटर आदी काही उद्योगांना फटका बसण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com