Mapusa Electric Shock: 'आमच्या जीवासोबत खेळ!' म्हापसा मार्केटमध्ये एकाला विजेचा धक्का; दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण

Mapusa Market Accident: म्हापसा मार्केटजवळच्या शकुंतला पुतळ्याजवळ सोमवारी रात्री एका व्यक्तीला विजेचा धक्का बसला.
electric shock in goa
electric shock in goaDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: मडगावच्या बाजारपेठेत वीजप्रवाहाने पाणी साचलेल्या रस्त्यावर एका माणसाला विजेचा धक्का बसल्याची घटना ताजी असताना, आता म्हापसा शहरातूनही एक अशीच गंभीर घटना समोर आली आहे. म्हापसा मार्केटजवळच्या शकुंतला पुतळ्याजवळ सोमवारी (दि.१८) रात्री एका व्यक्तीला विजेचा धक्का बसला. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वीजप्रवाह आल्यामुळे हा प्रकार घडला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि स्थानिक दुकानदारांनी तातडीने वीज मंडळाला याची माहिती दिली.

वीज मंडळाकडून तपास सुरू

माहिती मिळताच वीज विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता, जमिनीखालून गेलेल्या एका वीज केबलला मोठी हानी झाल्याचे आढळले. या केबलमधूनच वीजप्रवाह पाण्यात उतरून हा अपघात झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कोणत्याही पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी त्यांनी तात्काळ मार्केटमधील वीजपुरवठा खंडित केला.

electric shock in goa
Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! कारची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू

व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

या घटनेमुळे म्हापसा येथील व्यापाऱ्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच याच भागात एका गायीचा वीज प्रवाहामुळे मृत्यू झाला होता, अशी आठवण त्यांनी करून दिली. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे भूमिगत वीज केबलच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्यापाऱ्यांच्या मते, निकृष्ट दर्जाच्या केबल वापरल्यामुळे असे प्रकार घडत आहेत आणि यामुळे लोकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

गणेश चतुर्थीपूर्वी सुरक्षिततेची मागणी

आता अवघ्या काही दिवसांवर गणेश चतुर्थीचा उत्सव येत आहे. गणेश चतुर्थीच्या काळात बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी असते. त्यामुळे अशावेळी सुरक्षितता आणखी महत्त्वाची ठरते. म्हापसा मर्चंट्स असोसिएशनने वीज मंडळाला आणि संबंधित प्रशासनाला तातडीने या समस्येवर तोडगा काढण्याची आणि गणेश चतुर्थीपूर्वी सर्व आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन वीज विभागाने दिले आहे. मात्र, केवळ आश्वासनांवर न थांबता, ठोस पाऊले उचलणे गरजेचे असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com