Sattari Light Issue
Sattari Light IssueDainik Gomantak

Sattari Light Issue : सत्तरीत नागरिकांच्या आक्रमकतेनंतर रातोरात वीज सेवा पूर्ववत; नेहमीचीच समस्या

Sattari Light Issue : नागरिकांत संताप; वीजपुरवठा सुरळीत करा, नंतरच माघारी फिरू असा आक्रमक पवित्रा लोकांनी घेतल्यावर बांबर येथे रातोरात वीज दुरुस्ती करण्यात आली.
Published on

वाळपई, सत्तरीत काल सकाळी मुसळधार पावसावेळी अनेक गावांतील वीज गूल झाली. त्यामुळे बांबर, नानोडा, कोदाळ, साट्रे, देरोडे, माळोली गावे अंधारात असल्याने संतप्त नागरिकांनी काल रात्री साडेनऊ वाजता वेळूस येथील वीज कार्यालयात धडक दिली.

वीजपुरवठा सुरळीत करा, नंतरच माघारी फिरू असा आक्रमक पवित्रा लोकांनी घेतल्यावर बांबर येथे रातोरात वीज दुरुस्ती करण्यात आली.

वरील सहा गावांत वीज समस्या ही नेहमीचीच बनलेली आहे. प्रत्येकवेळी वरील गावांतील लोकांना वीज कार्यालयात धडक द्यावीच लागते. काल सहा गावांत सकाळी नऊच्या दरम्यान पावसावेळी वीज गुल झाली होती, पण त्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. उलट सायंकाळी वीज वाहिन्यांत बिघाड असूनही दुरुस्ती करण्यात आली नव्हती.

Sattari Light Issue
Kolhapur-Goa: कोल्हापूरच्या महिलेने पोटच्या मुलीला एक लाख रुपयांना गोव्यात विकले, नोटरीद्वारे झाला व्यव्हार

किमान पाऊस थांबल्यानंतर तरी बांबर, नानोडा, साट्रे, माळोली, देरोडे, कोदाळ गावांतील वीजवाहिनीची पाहणी करून वीज समस्या सोडविली पाहिजे होती, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सायंकाळी वीज ट्रान्स्फॉर्मरवरून वीज लाईन बंद केली असे नागरिकांनी सांगितले. वरील गावांत वीज बंच केबलवरून वीजपुरवठा केला जातो. वीज बंच केबल समस्या ही कायमचीच बनलेली आहे. ती समस्या अजूनही सुटलेली नाही.

म्हणून नागरिक त्रस्त

सत्तरी तालुक्यात वीज समस्या गंभीर बनत असून वारंवार विजेचा लपंडाव सुरूच असतो. काल शनिवारी रात्री नगरगाव पंचायत क्षेत्रातील धावे, तार, उस्ते आदी गावांतही विजेचा लपंडाव सुरूच होता. दोन दोन मिनिटांनी वीज ये जा होत होती. त्यामुळे लोक त्रस्त बनले होते. एकीकडे नवीन केबल घालण्याची कामे सुरू आहेत, परंतु रात्रीच्यावेळी विजेचा लपंडाव नेहमीचाच झालेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com