Goa Tourism : अवैध धंद्यांपुढे सरकार हतबल; तेथे पंचायत काय करणार?

सिक्वेरा : पर्यटन मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा
Calangute panchayat
Calangute panchayatGomantak Digital Team

Goa Tourism : कळंगुटमधील अनैतिक व्यवसाय तसेच दलालांनी मांडलेला उच्छाद थांबविण्यासाठी पंचायत सर्वतोपरी कार्यरत आहे. परंतु आमच्या अधिकारांनाही मर्यादा आहेत. याप्रश्‍नी कारवाई व्हावी यासाठी मुख्यमंत्री डॉ. ‌‌प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले; परंतु सरकारलाच अवैध व्यवसाय बंद करता येत नसतील तर आम्ही तरी काय करणार, अशी खंत कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी व्यक्त केली.

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी याप्रश्‍नी केलेल्या वक्तव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या भागात अनेक वर्षांपासून अवैध व्यवसाय आणि परप्रांतीय दलालांनी उच्छाद मांडला आहे. मी सरपंचपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून या भागातील बेकायदा डान्सबार तसेच दलालांची दादागिरी थोपविण्याचे प्रयत्न केले. या कामात पंच सदस्यांसह पोलिसांचेही सहकार्य लाभले; परंतु राज्य सरकारच जर याबाबत गाफिल राहात असेल तर मी सरपंच म्हणून आणखी काय बोलणार, असा सवाल सिक्वेरा यांनी केला.

Calangute panchayat
Traditional Business: पारंपरिक व्यवसाय पुनर्जिवीत करणार- प्रदीप सरमोकादम

प्रसिद्धीसाठी पर्यटनमंत्र्यांचा खटाटोप

पर्यटनमंत्री रोहन खंवटे हल्ली वारंवार कळंगुटचा प्रश्न उपस्थित करून स्वत: प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करत आहेत. या भागातील, गुंडगिरी, चोऱ्या, खंडणी तसेच परप्रांतीय दलालांचा विषय तावातावाने मांडत आहेत; परंतु मांजराच्या गळ्यात नेमकी घंटा कुणी बांधायची, या प्रश्नाचे उत्तर मात्र कुणीच देत नाही.

हल्ली पर्यटकांना लुटण्याचे तसेच त्यांना मारहाण करण्याचे प्रकारही घडले आहेत. अशामुळे पर्यटन व्यवसायाला ग्रहण लागण्याची शक्यता आहे. परंतु याविषयी स्वत: काहीच न करता जो तो स्थानिक पंचायत तसेच पोलिसांकडे बोट दाखवून स्वत:ची जबाबदारी झटकत आहे, असे संतापाने सिक्वेरा म्हणाले.

Calangute panchayat
Goa Tourism: कॅसिनोमुळे पर्यटन उद्योगाला धोका

मंत्री खंवटे हे स्वत: सरकारचाच भाग आहेत. त्यामुळे खंवटे यांनी कळंगुटमधील अनैतिकता, अवैध व्यवसाय आणि दलालांनी मांडलेला उच्छाद, याबाबत केवळ प्रसार माध्यमांकडे वक्तव्ये करण्यापेक्षा स्वत: पुढाकार घेऊन कळंगुटमधील अनैतिकता कायमची नष्ट करण्यासाठी पावले उचलावीत. पंचायत नेहमीच त्यांच्या मागे राहील.

- जोसेफ सिक्वेरा, सरपंच, कळंगुट.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com