Margao Municipality to Tax Illegal Houses: मडगावात बेकायदेशीर घरांनाही लागणार कर

प्रक्रिया सुरू : कचरा शुल्क 600 वरून पोहोचले 900 रुपयांवर, घरपट्टीत मोठी वाढ
Margoan Municipality
Margoan MunicipalityGomantak Digital Team
Published on
Updated on

Margao Municipality to Tax Illegal Houses: मडगाव नगरपालिकेत गेल्या तीन दिवसांपासून घरपट्टी व कचरा शुल्क आकारणी सुरू झाली आहे. राज्य सरकारने 2020 साली घरपट्टी व कचरा शुल्कात केलेली वाढ मडगाव नगरपालिकेने लागू केली नव्हती.

पण यंदापासून ही वाढ लागू झाली असून कचरा शुल्क 600 वरून 900 रुपये आकारले जात आहेत. तसेच अवैध घरांनाही विविध कर लागू झाले आहेत.

पालिका क्षेत्रात अनेक बेकायदेशीर घरे आहेत. तसेच सार्वजनिक बांधकाम खाते, पोलिस, कोकण रेल्वे क्वॉटर्स आहेत. त्यांच्याकडून घरपट्टी, कचरा शुल्क आकारले जात नव्हते.

पण नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी लेखा विभागाला त्यांच्याकडूनही शुल्क वसुलीसाठी पत्रव्यवहार करण्याचे आदेश दिल्याचे कळते. तसेच झोपडपट्टी, अवैध घरांनाही कर, शुल्क वसुलीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.

Margoan Municipality
Old Goa Encroachment: जुने गोवेतील अतिक्रमणांवर कारवाई

...तरीही घरे बेकायदेशीरच

सरकारने घरपट्टी किंवा कचरा शुल्क वाढीचे परिपत्रक जारी केले. त्यात बेकायदा घरांना ते लागू करावे, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर घरांकडून कर व शुल्क वसुली केली, तर ती घरे कायदेशीर ठरणार नाहीत, असे स्पष्ट नमूद केल्याचे प्रभाग 12 चे नगरसेवक सगुण नायक यांनी नगरपालिकेच्या निदर्शनास आणले.

Margoan Municipality
Luizinho Faleiro: फालेरोंना राजीनामा देण्‍यास लावले, राजकीय विश्लेषकांनी वर्तवला अंदाज

महसुलात मोठी वाढ

दुकानदारांच्या कचरा शुल्कांत वाढ होण्याची शक्यता आहे. घरांसाठी कचरा शुल्क 300 रुपयांनी वाढविला; पण दुकानदारांना 1800 वरून 300 रुपये कमी केल्याने नागरिक नाराज आहेत.

दरम्यान, विविध कर वसुलीमुळे पालिकेच्या महसुलात वाढ झाली आहे. तीन दिवसांत जवळपास ५० लाखांचा कररुपी महसूल पालिकेला प्राप्त झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com