Luizinho Faleiro: फालेरोंना राजीनामा देण्‍यास लावले, राजकीय विश्लेषकांनी वर्तवला अंदाज

राजकीय निरीक्षक : काँग्रेसने उमेदवारी दिल्यास होणार नुकसान
Luizinho Faleiro resigns as MP
Luizinho Faleiro resigns as MP Dainik Gomantak
Published on
Updated on

राज्यसभा खासदार असूनही गोव्यासाठी फारसे काही करता येत नाही हे समजल्‍यामुळेच मी खासदारकीचा राजीनामा दिलाय असे कारण लुईझिन फालेरो यांनी दिले असले तरी प्रत्यक्षात तृणमूल काँग्रेसच्‍या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आदेश दिल्यामुळेच त्यांना खासदारकी सोडावी लागली आहे, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

पीटीआयने तृणमूलसूत्रांचा हवाला देऊन फालेरो यांना राजीनामा देण्याची सूचना काही महिन्यांपूर्वीच केली होती. मात्र त्यासाठी त्यांनी काही वेळ मागून घेतला होता असे म्हटले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, फालेरो यांनी तृणमूलच्‍या नेत्यांना गोव्यात पक्ष स्थिरस्थावर करण्याबरोबरच ईशान्य भारतातील राजकीय नेत्यांना तृणमूल काँग्रेसकडे वळविण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठीच त्यांना राज्यसभा खासदार बनविण्यात आले होते.

मात्र दोन्ही आघाड्यांवर ते सपशेल अपयशी ठरले. त्यामुळेच त्यांना खासदारपदावरून पायउतार होण्यास सांगण्यात आले. फालेरो हे काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सरचिटणीस असताना त्यांच्याकडे ईशान्य भारतातील राज्यांचा ताबा देण्यात आला होता.

फालेरो यांच्या राजीनाम्यावर राजकीय विश्लेषक राधाराव ग्रासियस म्हणाले, फालेरो यांनी स्वखुशीने राजीनामा दिला यावर माझा अजिबात विश्वास नाही. त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले आहे.

सहा महिन्यांपूर्वीच त्यांना तशी सूचना करण्‍यात आली होती अशी मला विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली होती आणि सहा महिन्यांपूर्वीच मी माझ्या फेसबुक पोस्टवर तसा उल्लेखही केला होता.

ज्या दिवशी त्यांनी आपण फातोर्ड्यातून विधानसभा निवडणूक लढविणार नाही असे म्हटले, त्याच दिवशी त्यांचे आणि ममता बॅनर्जी यांचे संबंध ताणले होते. त्यामुळेच नंतर त्यांना तृणमूलच्या राष्ट्रीय कार्यकारीणीतून काढून टाकले होते, असेही ग्रासियस म्हणाले.

Luizinho Faleiro resigns as MP
Panaji Session Court : सहा महिन्यांत शेडमधील कचऱ्याची विल्हेवाट लावा : खंडपीठाचे निर्देश

फालेरोंच्‍या घरवापसीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील : सार्दिन

लुईझिन फालेरो यांनी कॉंग्रेस पक्षात पुनर्प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली तर त्याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे दक्षिण गोव्याचे काँग्रेसचे खासदार फ्रान्‍सिस सार्दिन यांनी पत्रकार परीषदेत सांगितले. एक मात्र खरे की गोव्यातील एक खासदार कमी झाला, असे ते म्हणाले.

लोकसभेच्या निवडणुकीत दक्षिण गोव्यात कॉंग्रेसला कुणीही कमी लेखू नये. या मतदारसंघात कॉंग्रेस पक्ष भक्कम आहे. भाजपला इथे विजयाची शक्यता दिसत नसल्यानेच त्यानी कॉंग्रेसमधील आठ आमदारांना फोडले.

पण त्‍यामुळे त्‍या पक्षाला काहीच फायदा होणार नाही, असे सार्दिन म्‍हणाले. लोकसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. स्वत:च्या उमेदवारीबद्दल आपण एवढ्यात काहीच सांगू शकत नाही, असे 15 एप्रिल रोजी आपला 77 वा वाढदिवस साजरा करणारे सार्दिन म्‍हणाले.

Luizinho Faleiro resigns as MP
Education Policy In Goa: देर से ही सही.... पण हे कराच, महोदय!

लुईझिन फालेरो हे सध्याच्या परिस्थितीत आपली राजकीय ताकद गमावून बसलेले नेते आहेत. काँग्रेसने त्यांना उमेदवारी देण्याऐवजी अन्य कुठल्याही युवा आणि चांगल्या उमेदवाराला उमेदवारी दिली तर त्‍या पक्षाला त्याचा अधिक फायदा होईल.

- राधाराव ग्रासियस, राजकीय निरीक्षक

लुईझिन फालेरो यांना काँग्रेस पक्ष उमेदवारी देईल असे मला वाटत नाही. कारण ते निवृत्तीच्या मार्गावर आहेत. दुसरे म्हणजे त्यांनी ज्यावेळी तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला, त्यावेळीच त्यांची राजकीय पत संपली. काँग्रेस पक्षालाही त्याची जाणीव आहे.

- ॲड. क्‍लिओफात कुतिन्हो, राजकीय निरीक्षक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com