Margao News: सासूचं घर बळकावणाऱ्या सूनेला दणका; दहा वर्षांनी मिळाला न्याय

Margao Municipal Council: माजी नगरसेवकांच्या आईला अखेर दहा वर्षांनी मुरगाव पालिकेचे मुख्याधिकारी दिपेश प्रियोळकर यांनी न्याय दिला.
अखेर दहा वर्षांनी मिळाला न्याय! सूनेकडून घरावर बेकायदेशीर कब्जा; सासूने जिंकली न्यायाची लढाई
Margaon Municipality Chief Dipesh Priolkar delivered justice to former corporator mother Indira Halarnkar after long wait of ten years Dainik Gomantak
Published on
Updated on

माजी नगरसेवकांच्या आईला अखेर दहा वर्षांनी मुरगाव पालिकेचे मुख्याधिकारी दिपेश प्रियोळकर यांनी न्याय दिला. वास्को-बायणा येथील ज्येष्ठ महिला श्रीमती इंदिरा चंद्रू हळर्णकर (८४) यांच्या पतीच्या नावाने असलेली घरपट्टी बेकायदेशीररीत्या तिच्या सुनेने गैरमार्गाने आपल्या नावावर केले होते आणि घरावर कब्जा केले. ज्येष्ठ महिला इंदिरा हळर्णकर यांनी पालिकेत वयाच्या ७४ वर्षी म्हणजे २०१४ मध्ये न्यायासाठी लढाई सुरू केली. त्यात इंदिरा यांना २५ जुलै २०२४ रोजी न्याय मिळाला.

मुरगाव पालिकेचे माजी नगरसेवक स्वः अशोक चंद्रू हळर्णकर यांच्या मातोश्रीला दहा वर्षांनी मोठ्या परिश्रमाने न्याय मिळाला. वास्को बायणा हाऊसिंग बोर्ड वसाहतीच्या समोर राहणारी ज्येष्ठ महिला श्रीमती इंदिरा चंद्रू हळर्णकर यांचे पती स्वः चंद्रू बाबलो हळर्णकर यांच्या नावावर असलेले घर आपल्या नावावर केले आणि मुरगाव पालिकेत त्या घराची घरपट्टी इंदिरा यांच्या सुनेने गैरमार्गाने बोगस कागदपत्रे दाखवून आपल्या नावावर करून घेतली.

इंदिरा यांना एका गॅरेजमधील छोट्या खोलीत ठेवले होते. सुनेने व नातवाने अनेक वेळा ज्येष्ठ महिला इंदिरा यांना मारहाण सुद्धा केली होती, अशी माहिती मुरगाव तालुका ज्येष्ठ नागरिक मंचचे प्रमुख अनिल चोडणकर, बायणा भागातील सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश आमोणकर व ॲन्थोनी फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेतून दिली.

अखेर दहा वर्षांनी मिळाला न्याय! सूनेकडून घरावर बेकायदेशीर कब्जा; सासूने जिंकली न्यायाची लढाई
Margaon Municipality: ... तर मग वाट कसली पाहता? काकोडा प्रकल्पप्रश्नी खंडपीठाने सरकारला सुनावले

इंदिरा यांच्या घराची घरपट्टी दरवर्षी तिच्या मुलीचे पती (जावई) मुरगाव पालिकेत जाऊन भरायचे. २०१४ साली घरपट्टी भरण्यासाठी पालिकेत गेले असता चंद्रू बाबलो हळर्णकर यांच्यावर नावावर घरपट्टी नसून, घरपट्टी उज्वला अशोक हळर्णकर यांच्या नावावर असल्याचे सांगण्यात आले. तेव्हापासून ज्येष्ठ महिला इंदिरा चंद्रू हळर्णकर हिने न्यायासाठी मुरगाव पालिकेत लढाई सुरू केली.

तसेच तिला बायणा येथील राहत्या घरांत योग्यरीत्या राहण्यासाठी स्थानिक रहिवासी जयप्रकाश आमोणकर, ॲन्थोनी फर्नांडिस व इतरांनी सदैव सहकार्य केले. तसेच न्यायासाठी त्याचे शेजारी ॲन्थोनी फर्नांडिस यांनी सदर माहिती मडगाव येथील अखिल गोवा ज्येष्ठ नागरिक मंचच्या अध्यक्षाच्या समोर मांडली. मुरगाव तालुका ज्येष्ठ नागरिक मंचचे प्रमुख अनिल चोडणकर यांनी ज्येष्ठ महिला इंदिरा हळर्णकर यांच्या न्यायासाठी पालिकेत न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

दोन कागदोपत्री बोगस

उज्वला हळर्णकर यांनी घरपट्टी भरण्यासाठी आपले नाव लावले, त्यासाठी त्यांनी दोन कागदपत्रे बोगस दाखविल्याचे माहिती हक्क कायद्याखाली प्राप्त झाल्याचे चोडणकर यांनी उघड केले. अखेर दहा वर्षांचा न्यायिक लढा संपुष्टात आला, तो मुरगाव पालिकेचे मुख्याधिकारी दिपेश प्रियोळकर यांच्या न्यायामुळे अशी माहिती जयप्रकाश आमोणकर व ॲंन्थोनी फर्नांडिस यांनी दिली.

अखेर दहा वर्षांनी मिळाला न्याय! सूनेकडून घरावर बेकायदेशीर कब्जा; सासूने जिंकली न्यायाची लढाई
Margaon Municipality: रेंट अ बाईकप्रश्‍नी चौकशीनंतर कायदेशीर कारवाई करणार - पालिकेचा निर्णय

सखोल चौकशी हवी!

एका माजी नगरसेवकाच्या आईला आपल्या पतीच्या घराचे कागदपत्र पुन्हा आपल्या पतीच्या नावावर करण्यासाठी दहा वर्षे वाट पाहावी लागली. यासाठी मुरगाव पालिकेने घरपट्टी एखाद्याच्या नावावरील दुसऱ्याच्या नावावर करायची असेल तर सखोल चौकशी करून घ्यावी, अशी मागणी जयप्रकाश आमोणकर यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.

अखेर दहा वर्षांनी मिळाला न्याय! सूनेकडून घरावर बेकायदेशीर कब्जा; सासूने जिंकली न्यायाची लढाई
Margao News : ‘सोनसडो‘संदर्भात मुदत पाळण्‍यात अपयश; याचिकादाराची सरकार, नगरपालिका, संबंधित आमदारांवर टीका

पालिकेचा हलगर्जीपणा!

मुरगाव पालिकेने इंदिरा हळर्णकर यांना न्याय देण्यासाठी खूपच हलगर्जीपणा दाखविला. माजी मुख्याधिकारी दिपाली नाईक यांनी हळर्णकर कुंटूबांना बोलावून मध्यस्थी करण्याचे अनेकवेळा प्रयत्न केले होते, अशी माहिती चोडणकर यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com