Margaon Municipality: रेंट अ बाईकप्रश्‍नी चौकशीनंतर कायदेशीर कारवाई करणार - पालिकेचा निर्णय

नगराध्यक्ष शिरोडकर ः पालिका बैठकीत निर्णय
Margaon Municipality
Margaon MunicipalityDainik Gomantak
Published on
Updated on

Margaon Municipality : रेंट अ बाईकप्रश्‍नी चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी बैठकीत सांगितले. मडगाव नगरपालिका परिसरात रेंट अ बाईकचा व्यवसाय करणारे आपल्या दुचाकी ठेवतात त्यामुळे नगरपालिकेत कामानिमित्त येणाऱ्या, तसेच मार्केटमधील व्यापारी व ग्राहकांना आपल्या दुचाकी ठेवण्यास जागा मिळत नाही.

यासंदर्भात नगरसेवक महेश आमोणकर यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना लेखी तक्रार दिली होती. त्यानुसार गुरुवारी (ता. ९) नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये सर्वसंबंधितांची एक बैठक बोलावण्यात आली होती.

या बैठकीला नगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी, वाहतूक खात्याचे अधिकारी, वाहतूक पोलिस उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर, गांधी मार्केट व्यापारी संघटनेचे राजेंद्र आजगावकर, न्यू मार्केट व्यापारी संघटनेचे विनोद शिरोडकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर म्हणाले, रेंट अ बाईकसंदर्भात कारवाई करण्याचा अधिकार वाहतूक पोलिसांना नसतो. त्यामुळे आतान वाहतूक खात्यामार्फतच चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, पण त्यासाठी काही कायदेशीर सोपस्कार पूर्ण करावे लागतील.

नगरपालिकेने रेंट अ बाईक व्यवसाय करणाऱ्यांना पालिका परिसरात दुचाकी ठेवण्याची परवानगी दिलेली नाही.

Margaon Municipality
Religious Tradition: मानाच्या श्रीफळाची विधिवत स्थापना

या बैठकीत शिगमोत्सवाबाबतही चर्चा झाली. वाहतुकीसाठी रस्ता, पार्किंगसाठी जागा व इतर जे परवाने लागतील त्यासंदर्भातही संबंधित अधिकाऱ्यांकडे चर्चा केल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.

नगरसेवक महेश आमोणकर यांनी सांगितले की, आजची बैठक यशस्वी झाली. संबंधित खात्यांकडे समन्वय साधून कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विनोद शिरोडकर यांनीही बैठकीत झालेल्या चर्चेसंदर्भात समाधान व्यक्त केले.

Margaon Municipality
Goa Shigmotsav 2023: बोर्डेतील घोडेमोडणी जल्लोषात

रेंट अ बाईकला दिलेल्या परवान्याची चौकशी केली जाईल व कायदेशीररित्या जी कारवाई शक्य आहे ती केली जाईल. सर्वप्रथम सर्व्हेक्षण केले जाईल व गरज पडल्यास जागा शोधून त्यांना आपल्या दुचाकी तिथे ठेवता येतील अशी व्यवस्था करण्यात येईल.

- दामोदर शिरोडकर, नगराध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com