Margaon Building Collapse: पावसाळ्यात वाढला धोका! मडगावात जीर्ण इमारती कोसळण्याचा सिलसिला; "उपाय करा" स्थानिकांची मागणी

Monsoon Building Risk Goa: जुन्या इमारतींच्या सुरक्षिततेबाबत सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे
old buildings Margao
old buildings MargaoDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोव्यात सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील जुन्या आणि जीर्ण झालेल्या इमारतींचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. गांधी मार्केटजवळच्या एका इमारतीचा भाग कोसळल्यानंतर, आता शनिवारी (दि. २४) सकाळी मडगावातील पालिका इमारतीमागे असलेल्या सिने लता परिसरातील जुन्या आंताव इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळला.

अपघाताचा धोका कायम, वाहतूक वळवली

वाढत्या पावसामुळे अशा धोकादायक इमारतींबाबत स्थानिक नागरिकांची चिंता वाढली आहे. जुन्या इमारतींच्या सुरक्षिततेबाबत सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आंताव इमारतीत अजूनही अनेक दुकाने कार्यरत आहेत आणि मोठ्या संख्येने ग्राहक येथे खरेदीसाठी येतात. तसेच, पावसाळ्यात अनेकजण या जीर्ण इमारतीचा आसरा घेऊन चालत जात असतात. अशावेळी इमारतीचा आणखी काही भाग कोसळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

या गंभीर धोक्याच्या पार्श्वभूमीवर, मडगाव वाहतूक पोलिसांनी तातडीने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. मडगावचे पोलीस निरीक्षक सूरज सामंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन सुरक्षिततेच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी धोकादायक वीजवाहिन्यांचा विद्युत प्रवाह खंडित केला, तर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोसळलेल्या स्लॅबचे तुकडे बाजूला करण्याचे काम हाती घेतले आहे.

गेल्या काही वर्षांतील घटनांचा सिलसिला

मडगावातील धोकादायक इमारतींचा हा प्रश्न नवीन नाही. चार वर्षांपूर्वी गांधी मार्केटनजीकच्या एका इमारतीचा भाग कोसळल्यानंतर ती सील करून धोकादायक घोषित करण्यात आली होती. गेल्या वर्षी ती इमारत जमीनदोस्त करण्यात आली.

old buildings Margao
Margaon News: ..हाच भाजप सरकारचा 'गळका' विकास! विरोधक आक्रमक; 9 महिन्यांपूर्वीच उद्‌घाटन झालेल्या रवींद्र भवनात पाणीच पाणी

विशेष म्हणजे, शनिवारी कोसळलेल्या आंताव इमारतीच्या बाजूलाच असलेल्या आणि वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या जुन्या बँक ऑफ इंडिया शाखेच्या जीर्ण इमारतीचा बाल्कनीचा मोठा भाग काही दिवसांपूर्वीच कोसळला होता.

यात तीन गाड्यांचे नुकसान झाले होते आणि गाडीतील एक मुलगा थोडक्यात बचावला होता. गेल्या महिन्यात खारेबांध परिसरातील दाऊद चाळ या इमारतीत आग लागल्याने तेथील रहिवाशांना बाहेर काढावे लागले होते. या घटना मडगावातील धोकादायक इमारतींच्या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com