Margaon: 'जेएसडब्ल्यू'चे कोळसा हाताळणी 'घुमट' सज्ज, 30 वर्षांपासून होणाऱ्या काेळसा प्रदूषणापासून मिळेल दिलासा

Mormugao Coal Handling Dome: मुरगाव बंदरातील बहुचर्चित कोळसा हाताळणी घुमट (डोम) अखेर सज्ज झाला आहे. यामुळे ‘जेएसडब्ल्यू’ची कोळसा हाताळणी आता उघड्यावर होणार नाही.
Margaon
MargaonDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मुरगाव बंदरातील बहुचर्चित कोळसा हाताळणी घुमट (डोम) अखेर सज्ज झाला आहे. यामुळे ‘जेएसडब्ल्यू’ची कोळसा हाताळणी आता उघड्यावर होणार नाही. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होणार असून स्थानिक लोकांना कोळसा प्रदूषणापासून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

मुरगाव बंदरातील धक्का क्रमांक पाच व धक्का क्रमांक सहावर जिंदाल साऊथ वेस्ट कंपनीने हा ‘घुमट’ उभारलेला आहे. या प्रकल्पाचे काम साधारण दोन वर्षांपूर्वीच सुरू झाले होते. सध्या हे काम अखेरच्या टप्प्यात असून जवळजवळ नव्वद टक्के काम पूर्ण झालेले आहे. बंदरातील या धक्क्यांवर सुमारे ४३ हजार चौरस मीटर क्षेत्रात डोमची उभारणी करण्यात आलेली आहे. या डोमच्या छताखालीच ‘जेएसडब्ल्यू’ची कोळसा हाताळणी होणार आहे.

Margaon
Goa Crime: परदेशात नोकरी करायचं स्वप्न अखेर स्वप्नच राहिलं, मडगावात रेल्वे रूळावर आढळला युवकाचा मृतदेह

रेल्वे वॅगनमधून कर्नाटककडे जाणारा कोळसा या डोममध्येच भरला जाणार आहे. त्यामुळे उघड्या वातावरणात होणारी कोळशाची हाताळणी आता या धक्क्यांवर जवळजवळ बंदच होणार आहे. त्यामुळे मागच्या जवळपास तीस वर्षांपासून बंदरातून होणाऱ्या काेळसा प्रदूषणावर नियंत्रण येणार आहे आणि कोळसा प्रदूषण सहन करणाऱ्या स्‍थानिक लोकांना बऱ्याच प्रमाणात दिलासा मिळण्‍याची शक्‍यता आहे.

२.५ लाख टन कोळसा साठवणे शक्य

  • जेएसडब्‍ल्‍यू कंपनीच्‍या सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, धक्‍का क्रमांक पाच व धक्‍का क्रमांक सहावर वार्षिक ५.५ दशलक्ष टन कोळशाची हाताळणी होते. त्‍याचबरोबर एक मेट्रिक चुनखडीचीही हाताळणी होत असते.

  • डोम उभारण्‍यात आल्‍यामुळे आता २.५ लाख टन कोळशाची साठवणूक करणेही शक्य होणार आहे. शिवाय या धक्क्यांवर आधीपासूनच कोळसा हाताळणी यांत्रिक पद्धतीने होत असते.

  • कर्नाटकातील बेल्लारी येथे मुरगाव बंदरातून जाणारा कोळसा रेल्वे वॅगनमधून पूर्ण सुरक्षित पद्धतीने पाठवण्यात येत असतो, त्यामुळे वाहतुकीदरम्यानही प्रदूषण होणार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Margaon
Goa Forest: गोव्यातील निम्म्या वनक्षेत्राला वणव्याचा धोका, केंद्रीय संशोधन संस्थेच्या अभ्यासात धक्कादायक माहिती उघड

हवेच्या दर्जात होईल सुधारणा

या घुमटाच्या उभारणीमुळे वातावरणात प्रदूषण होणार नसल्याने परिसरातील हवेच्या दर्जात सुधारणा होईल. हवा प्रदूषणाच्या विषयावर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ देखरेख ठेवील, असा दावा कंपनीने केला आहे. अशाच प्रकारची डोम सुविधा ‘जेएसडब्ल्यू’ कंपनीने रत्नागिरीतील जयगड बंदरात तसेच रायगडच्या डोळवी बंदरातही उभारलेली आहे. या प्रकल्पांचा तेथील प्रदूषण रोखण्याच्या कामात चांगला लाभ झालेला आहे. मुरगाव बंदरात आता ही सुविधा उपलब्ध झाल्याने प्रदूषण रोखण्यास चांगलीच मदत होईल, अशी आशा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com