Goa Fish Market: निविदाच नाही, मग 'सोपो' कर कसा? बोटमालक संघटनेचा सवाल, 'एसजीपीडीए' मार्केटमधील घोळ

Margao SGPDA fish market: मडगावमधील एसजीपीडीए घाऊक मासळी मार्केट हे सतत टीकेचे लक्ष्य बनले आहे. घाऊक मासळी मार्केटच्या इमारतीचे अजूनही उद्‌घाटन करण्यात आलेले नाही.
Margao SGPDA fish market
Goa Fish MarketDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: मडगावमधील एसजीपीडीए घाऊक मासळी मार्केट हे सतत टीकेचे लक्ष्य बनले आहे. घाऊक मासळी मार्केटच्या इमारतीचे अजूनही उद्‌घाटन करण्यात आलेले नाही. काही दिवसांपूर्वीच एसजीपीडीएचे अध्यक्ष आमदार दाजी साळकर, सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत व जीएसआयडीसीचे अध्यक्ष आमदार मायकल लोबो यांनी या मार्केट इमारतीची पाहणी केली होती. मात्र, उद्‌घाटनासंदर्भात अजून कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत.

त्याचप्रमाणे सोपो गोळा करण्याचे कंत्राट अजून कोणालाही दिले नसताना व त्यासंदर्भात निविदाही जाहीर केलेली नसताना देखील मासे विक्रेत्यांकडून सोपो गोळा केला जात असल्याची तक्रार बोटमालक संघटनेने केली आहे. यासंदर्भात बोलताना बोट मालक संघटनेचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी सोपो गोळा करण्यासंदर्भात गोलमाल असल्याचा आरोप केला.

Margao SGPDA fish market
Margao Fish Market: मडगाव 'मासळी मार्केट'ची इमारत बांधून वर्ष उलटलं, पण उद्घाटनाला मुहूर्त मिळेना! व्यापारी आणि मच्छीमार संभ्रमात

ते म्हणाले, ‘‘गेल्या वेळी जेव्हा सोपो गोळा करण्यासाठी निविदा जाहीर झाली होती, तेव्हा आम्ही या मार्केटची देखभाल करू, असे सांगितले होते. त्यानुसार आमच्या सोसायटीतर्फे निविदा भरली होती; पण त्यानंतर काहीच झाले नाही.

हे मासळी मार्केट केवळ गोमंतकीय पारंपरिक मासळी विक्रेते, रांपणकार यांच्यासाठी बांधले होते. मात्र, आता तिथे परराज्यातील व स्थलांतरित मासे विक्रेत्यांचे वर्चस्व होताना दिसत आहे. एसजीपीडीएसुद्धा आमच्यापेक्षा त्यांच्या मागण्यांना जास्त प्राधान्य देते,’ असेही डिसिल्वा यांनी सांगितले. सोपोच्या नावाखाली तिथे मासे विक्रेत्यांची लूट केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Margao SGPDA fish market
Arambol Fish Market: हरमल मासळी मार्केटच्या छपराचे काम पूर्ण; विक्रेते, ग्राहकांना दिलासा; आमदार आरोलकरांचे अभिनंदन

तर मार्केट गोमंतकीयांच्या हातातून जाणार

फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री व मडगावचे आमदार दिगंबर कामत हे एसजीपीडीएचे सदस्य आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन काहीतरी केले पाहिजे; अन्यथा हे मार्केट गोमंतकीयांच्या हातातून निसटेल, अशी भीती डिसिल्वा यांनी व्यक्त केली. या मार्केटमध्ये बेतूल, बाणावली, कांसावली, कोलवा येथील मच्छीमार मासे विक्रीसाठी येतात. त्यांच्या प्रत्येकाच्या सोसायट्या आहेत. या सोसायट्यांना तसेच स्थानिक बोट मालकांना एसजीपीडीएने विश्वासात घेण्याची मागणी त्यांनी केली.

कोल्ड स्टोरेजची व्यवस्था नाही

या मार्केटच्या इमारतीच्या बांधणीसाठी केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करण्यात आला आहे. मात्र, तिथे अजून कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करण्यात आलेली नाही. याचे उत्तर दाजी साळकर यांनी देणे गरजेचे आहे. शिवाय, त्यांनी एसजीपीडीएचा कारभार पारदर्शक करून व्यवहार सुरळीत करण्याची गरज असल्याचेही डिसिल्वा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com