Kerala Girl Molestation: रेल्वेतून गोव्याला येत असलेल्या केरळच्या पर्यटक महिलेचा विनयभंग

मडगावमध्ये कोकण रेल्वे पोलिसांनी संशयिताला केली अटक
Margao Railway Station:
Margao Railway Station:Dainik Gomantak

Kerala Girl Molestation in Railway traveling to Goa: पूर्णा एक्‍सप्रेस रेल्वेतून केरळहून गोव्‍यात येणार्‍या एका केरळी महिलेचा अश्लील हावभाव करून विनयभंग करणाऱ्या एकास कोकण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

मडगाव रेल्वे स्थानकावर ही कारवाई करण्यात आली. दत्तात्रय चव्‍हाण (वय ४७) असे संबंधित संशयिताचे नाव आहे. तो मूळचा कन्नूर (केरळ) येथील रहिवासी आहे.

Margao Railway Station:
Goa Gold Smuggling: गोवा पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राज्यातील विमानतळांवरील सोने तस्करीत हात

हा प्रकार पहाटे 1.30 वाजण्‍याच्‍या सुमारास घडला. ही महिला आपल्‍या दोन पुरुष मित्रांसोबत गोव्‍यात येत होती. रात्री ती झोपलेली असताना संशयित दत्तात्रय चव्हाण हा तिच्‍या बर्थजवळ गेला. त्याने तिच्याशी विक्षिप्‍त प्रकार केला. या महिलेच्या मित्राने हटकताच तो पळून गेला.

ही गाडी मडगावला पोहोचल्‍यावर पोलीस निरीक्षक सुनील गुडलर यांच्‍या नेतृत्‍वाखाली सहाय्‍यक उपनिरीक्षक गोम्‍स, हवालदार मिंगेल वाझ, पोलीस शिपाई कुलदीप गावकर आणि महिला पोलीस शिपाई नीता कवळेकर यांनी त्‍वरित शोधाशोध करीत आरोपीला पकडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com