Margao Railway : मडगाव रेल्‍वेस्‍थानकावर ‘रेंट अ बाईक’ सेवा नकोच; मुख्‍यमंत्र्यांची महामंडळाला सूचना

Margao Railway : महामंडळाचा हा निर्णय राज्यातील वाहतूक व्यवसायाच्या हिताचा नसल्‍याचेही त्‍यांना सांगण्‍यात आले आहे.
Margao Railway
Margao RailwayDainik Gomantak

Margao Railway :

पणजी, कोकण रेल्वेच्या मडगाव स्थानकावर ‘रेंट अ बाईक’ सेवा सुरू करू नका अशी सूचना कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांना केली आहे.

महामंडळाचा हा निर्णय राज्यातील वाहतूक व्यवसायाच्या हिताचा नसल्‍याचेही त्‍यांना सांगण्‍यात आले आहे. याविषयी त्‍यांनी आपण योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे. ते निविदा रद्द करतील याची खात्री आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, झा हे कोकण रेल्वे महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी आल्यानंतर ते मला भेटले नव्हते. म्हणून औपचारिक सदिच्छा भेट घेण्यासाठी ते आले होते. त्यांच्या या भेटीवेळी मी मडगावच्या ‘रेंट अ बाईक’चा विषय काढला. आपल्या मागील दौऱ्यात झा यांनी अशी सेवा उपलब्ध करण्याची घोषणा केली होती आणि महामंडळाने निविदाही मागविल्या होत्या.

Margao Railway
Goa Todays Live Update News: पावसाळी अधिवेशनासाठी नागरिकांकडून सरदेसाईंनी मागवल्या सूचना

झा यांनी मला आज सांगितले की, निविदा महामंडळाला उघडाव्या लागतील. पण राज्य सरकार परवानगी देणार नसेल तर ही सुविधा कोकण रेल्वे उपलब्ध करू शकणार नाही असेही सांगितले. राज्यातील वाहतूक व्यावसायिकांच्या हितासाठी सरकारकडून अशी परवानगी देणे कठीण होईल याची कल्पना त्यांना दिली आहे. त्‍यामुळे येत्या दोन दिवसांत योग्य तो निर्णय घेऊन कळवतो असे त्‍यांनी सांगितले असल्‍याचे मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

Margao Railway
Goa Todays Update News: कळंगुट पोलिसांची छापेमारी, 46,000 च्या हेरॉईनसह एकाला अटक

झा यांनी घेतली मुख्‍यमंत्र्यांची भेट; निविदेबाबत बोलण्‍यास नकार

कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांच्याशी संपर्क साधला असता निविदा विषयावर काहीही सांगण्यास त्‍यांनी नकार दिला. दोन दिवसांत याबाबत कोकण रेल्वे निर्णय घेणार आहे एवढेच त्यांनी सांगितले. ते म्हणाले, तो विषय मुख्यमंत्र्यांनी काढला होता, यामुळे त्यांनीच या विषयावर माहिती देणे योग्य ठरेल. माझी आज मुख्यमंत्र्यांसोबत सदिच्छा भेट होती. कोकण रेल्वे महसूल वाढीसाठी करत असलेल्या प्रयत्नांविषयी मी मुख्यमंत्र्यांना अवगत केले. त्यांनीही आमच्या कामाची प्रशंसा केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com