Goa Todays Update News: कळंगुट पोलिसांची छापेमारी, 46,000 च्या हेरॉईनसह एकाला अटक
कळंगुट पोलिसांची छापेमारी, 46,000 च्या हेरॉईनसह एकाला अटक
कळंगुट पोलिसांनी केलेल्या छापेमारीत जॉन अँटोनियो लोपेझला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडून 46,000 किमतीचे 4.6 ग्रॅम हेरॉईन जप्त केले. पीएसआय अक्षय पार्सेकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास सुरु आहे.
ढवळीत लोकविश्वास समोरील संरक्षक भिंत कोसळली, सुदैवाने अनर्थ टळला
ढवळी फोंडा येथील लोकविश्वास प्रतिष्ठान या दिव्यांग मुलांच्या शाळेसमोरील संरक्षक भिंत कोसळली. सदर घटना शुक्रवारी रात्री 8.30 वाजता घडली. जीवितहानी टळली. लोकविश्वास शाळेत तब्बल 250 विद्यर्थी शिकतात.
नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी सुदीन ढवळीकर दिल्लीत!
नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या टर्मच्या शपथविधीसाठी एनडीएचे घटक असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते आणि मंत्री सुदीन ढवळीकर दिल्लीत पोहोचले आहेत. एनडीएकडून ढवळीकरांना शपथविधीचे निमंत्रण देण्यात आले.
राज्यात पावसाचा रेड अलर्ट
राज्यात आज शनिवारी (8 जून) आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. राज्यात येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 10 आणि 11 जून रोजी पावसाचा ऑरेंज अलर्ट असेल, असे सांगण्यात आले आहे.
दक्षिण गोवा वन विभागाची कारवाई, दोन बेडूक शिकाऱ्यांना अटक
आळारी-तळप, किटला केपे येथे शुक्रवारी मध्यरात्री बेडकांची शिकार करणाऱ्या अल्डॅरीक फर्नांडिस आणि जेम्स परेरा यांनी दक्षिण गोवा नव विभागाच्या पिसोणे रेंजच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यांच्याकडून यावेळी बेडकांसह इतर साहित्य ताब्यात घेण्यात आले.
गोवा काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत राजघाट येथे महात्मा गांधींना अदरांजली वाहिली
गोवा काँग्रेसचे नेते अमित पाटकर यांच्यासोबत दक्षिण गोव्याचे विजयी उमेदवार विरियातो फर्नांडिस आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिल्लीत राजघाट येथे महात्मा गांधींना अदरांजली वाहिली. गांधींची सत्य आणि अहिंसा ही मूल्ये आजही आपल्याला मार्गदर्शन करतात. भारतासाठी काम करण्याची शपथ घेऊ या, असे अमित पाटकर म्हणाले.
चोरट्यांनी मडगावातील मोबाईल रिपेअरिंगचे दुकान फोडले
चोरट्यांनी मडगाव येथील जुन्या पिकअप स्टँडजवळील मोबाईल रिपेअरिंगचे दुकान फोडले. अंदाजे 60000 ते 70000 चे नुकसान झाले.
पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या गाडीचा अपघात, जीवीतहानी नाही!
सावर्डेहून कुळे दुधसागर येथे पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या गाडीचा वळडंव येथे अपघात झाला. चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. गाडीचे नुकसान असून सुदैवाने जीवीतहानी नाही.
मुख्यमंत्री सावंत यांनी घेतली एच. डी. कुमारस्वामी यांची भेट
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी JDS पक्षाचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांची गोवा सदन (नवी दिल्ली) येथे भेट घेतली. या भेटीत त्यांनी लोकसभा निवडणुकीतील एनडीएच्या यशाबद्दल केले अभिनंदन.
कार आणि स्कूटर यांच्यात अपघात, दोघेजण जखमी
कुर्टी येथील बगल रस्त्याच्या बाजूला असलेल्या सहकारी पेट्रोल समोर कार आणि स्कूटर यांच्यात अपघात झाला. या अपघातात अजय विनोद काखरकर आणि विलास नंदा तळेकर जखमी झाले. कार बोरीहून उसगावकडे जात होती. तर स्कूटर बोरी मार्गे जात होती. स्कूटर रस्त्यावर घेत असताना हा अपघात झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

