Margao New Market Building : पावसाळ्यापूर्वी न्यू मार्केट इमारतीची दुरुस्ती करावी

Margao New Market Building : न्यू मार्केट व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी सांगितले की, इमारतीची स्थिती वाईट आहे. पावसाळ्यात छताचे पाणी झिरपत असते, त्यामुळे व्यापाऱ्यांना व ग्राहकांना पुष्कळ त्रास सहन करावे लागतात.
Margao New Market Building
Margao New Market Building Dainik Gomantak

Margao New Market Building :

सासष्टी, मडगावमधील पालिकेच्या न्यू मार्केटची इमारत ही पोर्तुगीजकालीन असून ती मोडकळीस आली आहे. तिची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करणे आवश्यक असल्याची मागणी न्यू मार्केटमधील व्यापाऱ्यांनी केली आहे.

न्यू मार्केट व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी सांगितले की, इमारतीची स्थिती वाईट आहे. पावसाळ्यात छताचे पाणी झिरपत असते, त्यामुळे व्यापाऱ्यांना व ग्राहकांना पुष्कळ त्रास सहन करावे लागतात. तरी काही व्यापाऱ्यांनी आपआपल्या दुकानांवर पत्रे वगैरे घालून स्वत:पुरते संरक्षण केले आहे.

ही सर्वांत जुनी इमारत असल्याने ती पूर्णपणे नव्याने बांधणे गरजेचे आहे. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना याची कल्पना आहे. त्यांनी पुढाकार घेऊन सरकारतर्फे नवी इमारत बांधून द्यावी. दुर्घटना होईपर्यंत वाट पाहू नये, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.

Margao New Market Building
Goa Politics: लोकांचा भाजपविरोधातील राग व्यक्त, दोन्ही जागा जिंकण्याचा इंडिया आघाडी दावा

न्यू मार्केट इमारतीवरील जुने पत्रे काढून त्यावर झिंक पत्रे घालण्याच्या निविदा जाहीर केली आहे. आमदार दिगंबर कामत यांना याची पूर्ण कल्पना आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या कामाला विलंब झाला. आचारसंहिता संपल्यावर लगेच हे काम पूर्ण केले जाईल, असे आश्र्वासन कामत यांनी दिले आहे.

- गोपाळ नाईक, अध्यक्ष, न्यू मार्केट व्यापारी संघटना

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com