Margao: 'त्या’ वादग्रस्त सोपो ठेकेदाराला ‘क्लीन चीट’! मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याची सरदेसाईंची टीका

Margao Sopo Tax Case: सोपो कर ठेका मिळालेल्या ‘त्या’ वादग्रस्त ठेकेदाराला मडगाव पालिकेकडून क्लीन चीट देण्यात आली आहे.
Margao Sopo Tax Case
Vijai Sardesai Margao Sopo Contractor ClearanceDainik Gomantak
Published on
Updated on

Margao Sopo Contractor Clearance Vijai Sardesai Allegations

मडगाव: सोपो कर ठेका मिळालेल्या ‘त्या’ वादग्रस्त ठेकेदाराला मडगाव पालिकेकडून क्लीन चीट देण्यात आली आहे. ‘त्या’ ठेकेदारावरील आरोप पालिका मुख्याधिकाऱ्यांनी खोडून काढले.

संबंधित ठेकेदार जादा कर आकारणी करीत असल्याच्या आरोप मागच्या आठवड्यात शुक्रवारी झालेल्या मडगाव पालिकेच्या बैठकीत काही नगरसेवकांनी केला होता. त्याच दिवशी त्या ठेकेदाराला बोलावून घेऊन चौकशी केली. मात्र, या आरोपात तथ्य नव्हते. ज्यांनी हा मुद्दा बैठकीत काढला होता त्यांना पूर्ण माहिती नसावी, असे पालिकेचे मुख्याधिकारी मेल्विन वाझ म्हणाले.

पालिकेच्या बैठकीत नगरसेवक पूजा नाईक, राजू नाईक व अन्य काही नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता. मडगाव पालिकेचे सोपो कंत्राट मिलाग्रीस फर्नांडिस यांना मिळाले आहे. आपण त्या ठेकेदाराला बोलावून घेऊन जादा कर आकारणी पावत्यांबाबत चौकशी केली. मात्र, काहीच चुकीचे सापडले नाही, असे वाझ म्हणाले.

दरम्यान, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, आपल्याला यासंबंधी काही महिती नाही. हा विषय आपल्याकडे अजून आलेला नाही.

मार्गदर्शक तत्त्वांचे स्पष्ट उल्लंघन; विजय सरदेसाई

फातोर्डाचे आमदार आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी मडगाव पालिकेचे सोपो कंत्राट एका कंत्राटदाराला एकमेव निविदा येऊनही वादग्रस्तरीत्या दिल्याबद्दल भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली आहे आणि हे केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे स्पष्ट उल्लंघन असल्याचा दावा केला आहे.

Margao Sopo Tax Case
Mapusa Sopo Tax : म्हापशात वाढीव सोपोमुळे विक्रेत्यांत संभ्रम!

सरदेसाई यांनी या कंत्राटदाराला गुंड व खंडणीखोर म्हटलेले असून त्याच्यावर बाउन्सरचा वापर करून विक्रेत्यांचा छळ आणि शोषण केल्याचा आरोप केला आहे.

या ठेकेदाराच्या कारवायांचा थेट परिणाम बाजारपेठेतील मासळीच्या किमतीवर होईल. तो दादागिरी करून जितके हफ्ते गोळा करेल, तितकी मासळीची किंमत वाढेल. भाजपच्या कारभारामुळे सर्वसामान्यांचे जगणे असह्य होत आहे, असा दावा सरदेसाई यांनी केला. या निविदेला अखेरीस न्यायालयात आव्हान दिले जाईल, असा इशारा सरदेसाईंनी दिला.

Margao Sopo Tax Case
Margao Fish Market: 'सोपो' कोण गोळा करणार? मडगाव मासळी मार्केटमधील कंत्राटदारांमध्ये वाद

छोट्या विक्रेत्यांना लुटण्याचा डाव

या व्यक्तीला यापूर्वी दक्षिण गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाने बेकायदेशीरपणे निविदा दिली होती. परंतु तो सरकारी पैशांचा अपहार करत असल्याचे आढळून आल्यानंतर त्याला काढून टाकण्यात आले. आता त्याला पुन्हा मडगावात आणखी एक कंत्राट देण्यात आले आहे. छोट्या विक्रेत्यांना लुटण्याचा भाजपचा संकल्प यातून स्पष्ट दिसतो, अशी टीका सरदेसाई यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com