MACT Margao: अपघातात जखमी महिलेला भरपाई द्यावी , 4.51 लाख देण्याचा मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचा आदेश

Motor Accident Claims: सहा वर्षांपूर्वी झालेल्या एका अपघातात जखमी झालेल्या महिलेला साडेचार लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश मडगाव येथील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने दिला आहे.
Motor Accident Claims
MACT MargaoDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: सहा वर्षांपूर्वी झालेल्या एका अपघातात जखमी झालेल्या महिलेला साडेचार लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश मडगाव येथील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने दिला आहे. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीसह वाहनमालक आणि चालकाला ६.८० टक्के व्याजासह ही रक्कम देण्यास बजावले आहे.

मडगाव येथील शिवनेरी अपार्टमेंटजवळ १३ जानेवारी २०२० रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला होता. अपर्णा राऊत या त्यांच्या दुचाकीवरून जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका कारने त्यांना धडक दिली होती. त्यात त्यांच्या उजव्या गुडघ्याला गंभीर इजा झाली होती.

Motor Accident Claims
Goa State Women Commission: राज्य महिला आयोगाचा कारभार 87 दिवसांपासून ठप्प! माजी अध्यक्षा रंजिता पै यांच्यानंतर नव्या नियुक्तीला सावंत सरकारला मुहूर्त मिळेना

कारचालक आणि मालकाने न्यायालयात हा स्वयंअपघात होता व अर्जदार महिला यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचा दावा केला होता. मात्र, घटनास्थळाचा पंचनामा आणि वाहनांच्या नुकसानीचे पुरावे पाहता न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला. कार चुकीच्या बाजूने वेगात आल्यानेच हा अपघात झाल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

पैसे मिळेपर्यंत ६.८० टक्के वार्षिक व्याज

न्यायालयाने अपर्णा राऊत यांना झालेल्या जखमा, ५ टक्के कायमस्वरूपी अपंगत्व आणि त्यांच्या शिंपी व्यवसायावर झालेला परिणाम लक्षात घेऊन वैद्यकीय उपचारासाठी ५४,१३० रुपये, शारीरिक व मानसिक त्रासासाठी दोन लाख रुपये,

Motor Accident Claims
Women Reservation Bill: काँग्रेसकडून महिला शक्तीचा 'विश्वासघात'! दामू नाईकांचा हल्लाबोल; महिला मोर्चातर्फे पणजीत ‘जन आक्रोश’ रॅली

जीवनातील सुखसोयींच्या नुकसानासाठी एक लाख रुपये व उपचारादरम्यान उत्पन्नासाठी ९० हजार व इतर किरकोळ खर्चाचे साडेसात हजार अशी एकूण ४,५१,३६० रुपये व्याजासह रक्कम देण्याचे आदेश दिले. ही सर्व रक्कम दावा दाखल केल्याच्या तारखेपासून प्रत्यक्षात पैसे मिळेपर्यंत ६.८० टक्के वार्षिक व्याजासह देण्याचे निर्देश दिले आहेत. ही रक्कम न्यायाधिकरणाच्या मडगाव एसबीआय बँकेतील खात्यात जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com