Margao Accident: भावाला वाचवताना दहा वर्षीय बहिणीचा दुर्दैवी अंत

गोव्यात आलेल्या दिवशीच घात : बसखाली सापडून मुलगी ठार
Vasco Accident
Vasco Accident Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Mini Bus Accident: पकडापकडीचा खेळ खेळताना अचानक बससमोर आलेल्या आपल्या तीन वर्षांच्या भावाला वाचवताना 10 वर्षांच्या बहिणीचा बसच्या चाकाखाली येऊन दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना पाजीफोंड येथे आज, बुधवारी दुपारी घडली. विशेष म्हणजे, गुजरातचे हे अन्सारी कुटुंबीय आजच गोव्यात दाखल झाले होते.

Vasco Accident
Water Shortage: राज्यात पाणीटंचाईचं सावट; अतिरिक्त 250 एमएलडी पाण्याची आवश्‍यक

पाजीफोंड येथे बुधवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास घटना घडली. अमिनाखातून अन्सारी असे मृत मुलीचे नाव असून ती मूळ गुजरात राज्यातील सूरत येथील रहिवासी आहे. अमिनाचे वडील ई. अहमद हे आपल्या कुटुंबीयांसमवेत आजच गोव्यात आले होते. उदरनिर्वाहासाठी हे कुटुंबीय आपल्या अन्य एका ओळखीच्या कुटुंबीयांसमवेत गोव्यात आले होते.

Vasco Accident
Colvale Crime: विलासी आयुष्याचे आमिष दाखवून दोन मुलींचे अपहरण

पकडापकडीचा खेळ बेतला जीवावर

कुटुंबातील सदस्य टपरीवर चहा पित असताना अमिना, तिची एक बहीण व भाऊ तसेच दुसऱ्या कुटुंबातील एक तीन वर्षीय मुलगा हे पकडापकडीचा खेळ खेळत होते. खेळतानाच तिचा भाऊ रस्त्यावर आला. त्याचवेळी समोरून मिनी बस येत होती.

ती बघून भावाला वाचविण्यासाठी अमिना धावली आणि बसच्या पुढच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाली. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिचा भाऊही बसखाली अडकला. सुदैवाने त्याला इजा झाली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

GIM Student Attack
Vasco
Sporting Club Goa Charity Cup
Ghaziabad Double Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com