Margao : मानसिक ताण अनेक व्याधींचे आहे मूळ - डॉ. व्यंकटेश हेगडे

जीवनात एक श्रेष्‍ठ मानसिक परिस्‍थिती स्वीकारून आपल्‍या शक्‍तीतून, बुद्धीतून ताणावर मात करायची.
Dr. Venkatesh Hegde
Dr. Venkatesh HegdeDainik gomantak
Published on
Updated on

मडगाव : सहन करण्‍याच्‍या क्षमतेपेक्षा जास्‍त ताण माणसाच्‍या मनावर पडला तर त्‍याचा वाईट परिणाम शरीरावर होतो. मानसिक ताणतणावामुळे नैराश्‍‍य, मधुमेह, उच्‍च रक्‍तदाब, हृदयविकार आदी दुखणी होतात. हा ताणच कित्येक व्याधींचे मूळ आहे, असे मत प्रख्यात डॉक्टर आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे गोवा प्रमुख डॉ. व्यंकटेश हेगडे यांनी व्यक्त केले.

मडगाव रोटरी क्‍लबतर्फे आयोजित ‘मानसिक ताण नाहीसा करा’ या विषयावर हेगडे बोलत होते. जीवनात एक श्रेष्‍ठ मानसिक परिस्‍थिती स्वीकारून आपल्‍या शक्‍तीतून, बुद्धीतून ताणावर मात करायची. उच्‍च मानसिकतेतून अगदी सर्वांच्‍या निकट जायचे आणि अगदी नावडते कामही आनंदाने करायचे, असे विचार हेगडे यांनी यावेळी मांडले.

Dr. Venkatesh Hegde
Brain Health: तुम्हालाही 'या' सवयी असतील तर आजच सोडा अन्यथा...

भारतीय उच्‍च संस्‍कृतीत मुख्‍यत्‍वे मानसिक ताणावर मात कशी करायची त्‍याची शिकवण आहे. योग, प्राणायाम, ध्‍यानाद्वारे मन:शांती मिळविणे, मनाची स्‍थिती बिघडून निद्रानाश, नैराश्‍‍य आदी रोग झाले तर, मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन त्‍यासाठी औषधे घेणे, आपली बुद्धी पणाला लावून अभ्‍यास करणे महत्त्वाचे आहे.

- डॉ. व्यंकटेश हेगडे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे गोवा प्रमुख

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com