Margao News : मडगाव विकास आराखडा ताबडतोब रद्द करा!

ग्रामस्‍थांचा तीव्र विरोध : ‘गोंयच्या फुडले पिळगेखातीर’ संस्‍थेकडून 29 हरकती सादर
Margao News
Margao News Gomantak Digital Team

दक्षिण गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाने (एसजीपीडीए) आज मडगावचा विकास आराखडा : 2023 बाबत सुनावणी निश्र्चित केली होती. यावेळी अनेकांनी या आराखड्याला विरोध केला व आराखडा रद्द करण्याची तसेच सर्व मडगावकरांना विश्र्वासात घेऊन केवळ मडगावचे हित नजरेसमोर ठेवून कलम 25 डीसीपीअंतर्गत नवीन आराखडा तयार करण्याची मागणी केली.

‘गोंयच्या फुडल्या पिळगेखातीर’ या संस्थेने एकूण 29 हरकतींचे निवेदन एसजीपीडीए अधिकाऱ्यांना सादर केले. यासंदर्भात बोलताना सावियो कुतिन्हो यांनी सागितले की, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून या 29 हरकती सादर करण्यात आल्या आहेत. सखल भाग, झोनांमध्ये केलेले बदल, रस्ते, रिंग रोड, जलस्त्रोत, साळ नदी अशा वेगवेगळ्या विषयांवर या हरकती आहेत. रिंग रोडचा प्रश्र्न 30 वर्षे तसाच पडून आहे.

Margao News
Goa State level Swimming: खेलो इंडिया राज्य प्रशिक्षणार्थींची जलतरणात छाप; 17 पदकांची लयलूट

सदर आराखड्यात सिने लता ते अपोलो इस्पितळापर्यंत 15 मीटरचा रस्ता दाखवला आहे खरा. पण आता तिथे नवीन बांधकामे आली आहेत. रेल्वे क्वॉटर्सचीही उभारणी झाली आहे. आराखड्यात रस्ता दाखवूनही त्या जागांमध्ये बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे.

Margao News
Goa School : राज्यातील सर्व शाळा 5 जूनपासून होणार सुरू

डिसेंबर 2022 मध्ये एसजीपीडीएने मडगावचा विकास आराखडा : 2023 जाहीर केला. 11 जानेवारी 2023 रोजी आमच्‍या संस्थेने 29 हरकती सादर केल्या. 10 मार्च 2023 रोजी आम्हाला पाहणीसाठी बोलाविले होते व आज सुनावणी निश्र्चित करण्यात आली होती. या आराखड्यात बदल करणे गरजेचे आहे.

जॅक मास्कारेन्हस, ‘गोंयच्या फुडल्या पिळगेखातीर’चे अध्यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com