Goa School : राज्यातील सर्व शाळा 5 जूनपासून होणार सुरू

शिक्षण संचालक : दप्तरांचे वजन करणार कमी
Goa School
Goa School Gomantak Digital Team
Published on: 
Updated on: 

Goa School : राज्यातील सर्व शाळा 5 जूनपासून सुरू होतील. पहिला नर्सरी वर्ग 3 जुलैपासून सुरू होणार आहे. नवीन अभ्यासक्रमासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण संचालक शैलेंद्र झिंगडे यांनी ‘गोमन्तक’ला दिली. शिक्षण संचालक शैलेश यांनी सांगितले की, शाळेतील लोअर केजी ते बारावीपर्यंतचे वर्ग 5 जूनपासून सुरू होतील.

नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार 3 जुलैपासून केवळ पायाभरणी स्तर एक म्हणजे नर्सरी स्टेज एकचा वर्ग सुरू होईल. विनाअनुदानित, अनुदानित, शासकीय पाळणाघरात पायाभूत स्तर एकवर शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना एक महिन्याच्या कालावधीसाठी नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार अभ्यासक्रमासाठी सक्तीचे प्रशिक्षण दिले जाईल. शाळेच्या दप्तराचे वजन कमी करणे ही आमची संकल्पना असल्याचे झिंगडे यांनी स्पष्ट केले. यासाठी नवीन पाठ्यपुस्तके घरी ठेवण्यास परवानगी असून जुनी पाठ्यपुस्तके शाळेत ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे ते पुढे म्हणाले.

Goa School
Goa Mining: खनिज वाहतुकीतील वर्चस्वासाठी दोन मंत्र्यांमध्ये चढाओढ, भर उन्हात वाहनचालकांनाही वेठीस धरण्याचा प्रकार

30 टक्के पाठ्यपुस्तकांचे वितरण पूर्ण

पाठ्यपुस्तक वितरणाच्या स्थितीबाबत माहिती देताना झिंगडे म्हणाले की, आतापर्यंत बहुतांश तालुक्यांमध्ये 30 टक्के पाठ्यपुस्तकांचे वितरण पूर्ण झाले आहे. विभागाने शाळांना परिपत्रक जारी करून नवीन विद्यार्थ्यांना जुनी पाठ्यपुस्तके शाळेत ठेवण्यास सांगितले आहे. यापुढे विभाग पुन्हा विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके देईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Six School Students One Bike
Congress Alliance Goa 2027
House Of Abhinandan Mega project Goa
Diocesan Schools Pending Salary Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com