Margao: ...तर मडगाव बकाल दिसले नसते! विकासकामांसाठी निधीचा व्यवस्थित वापर न झाल्याचा कॉंग्रेसचा आरोप

Goa Congress: जनतेचा पैसा विकासकामांसाठी व्यवस्थित वापरला असता तर आज मडगाव शहर बकाल दिसले नसते, असे कॉंग्रेसचे मडगाव गट निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी सांगितले.
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : जनतेचा पैसा विकासकामांसाठी व्यवस्थित वापरला असता तर आज मडगाव शहर बकाल दिसले नसते, असे कॉंग्रेसचे मडगाव गट निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी सांगितले.

कुतिन्हो यांनी पत्रकार परिषद घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला.

यावेळी लालन पार्सेकर, दामोदर वंसकर, जावेद शेख, लिंकन गोम्स, अझीझ शाह उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी मंत्री कामत यांनी ज्या ठिकाणी ''प्रॉमेनेड'' बांधकामाचे भूमिपूजन केले होते, त्याच ठिकाणी ही पत्रकार परिषद घेण्यात आली.

Goa Congress
Goa Politics: काँग्रेसजनांनी 'आप'मध्ये यावे, अरविंद केजरीवालांची काँग्रेस कार्यकर्त्यांना हाक

हातगाड्या पुनर्वसनाच्या मुद्द्यावर आमदारांनी जनतेची दिशाभूल केल्याचे सांगत कुतिन्हो यांनी आमदारांवर हल्लाबोल केला. अधिसूचित फेरीवाला क्षेत्रांचा बेकायदेशीरपणे गाड्या उभारण्यासाठी वापर केला गेला, म्हणून आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमदारांनी याचिका फेटाळल्याचा खोटा दावा केल्याचे सांगत, प्रत्यक्षात न्यायालयाने नगरपालिकेला ‘द स्ट्रीट व्हेंडर्स (प्रोटेक्शन ऑफ लाइव्हलीहुड अँड रेग्युलेशन ऑफ स्ट्रीट व्हेंडिंग) ॲक्ट २०१४’ लागू करण्यासाठी नगर पथविक्रेता समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते, असे त्यांनी सांगितले. मडगाव नगरपालिका उच्च न्यायालयाच्या निर्देशांचा अवमान करत असल्याचेही कुतिन्हो म्हणाले.

गणेशोत्सव मंडप घोटाळ्यासह निधी गैरव्यवहाराच्या अनेक प्रकरणांचा संदर्भ देत, जोपर्यंत मडगावकर या मोठ्या प्रमाणावरील गैरव्यवहार सहन करत राहतील, तोपर्यंत शहराची स्थिती सुधारेल अशी अपेक्षा नाही. शहरात बदल हवा असल्यास जनतेने जागे व्हावे आणि उत्तरदायित्वाची मागणी करावी, असे कुतिन्हो यांनी म्हणाले.

Goa Congress
Goa Politics: 'आरजी'शी युतीस विरियातोंचा हाेता विरोध, तीन आमदारांचा आग्रह; परब यांच्‍या पवित्र्याबद्दल होता संशय

कामे अपूर्ण; पण पूर्ततेचे दावे

मे २०२३ मध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते १४ कोटी रुपयांच्या रस्ता सुधारणा आणि रुंदीकरण कामाचे (खारेबंद पूल ते रावणफोंड सर्कल) भूमिपूजन झाले होते. व्हिक्टर हॉस्पिटल ते रेल्वे स्टेशनपर्यंतच्या कामाचा अपवाद वगळता इतर कोणतेही काम झालेले नाही, तरीही ६० टक्के काम पूर्ण झाल्याचे दावे केले जात आहेत, याकडे कुतिन्हो यांनी लक्ष वेधले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com