मडगाव: फातोर्ड्यात शनिवारी ‘वुई फॉर फातोर्डा’तर्फे कार्निव्हलनिमित्त मिनी चित्ररथ मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली आणि फातोर्डा शहर कार्निव्हलमय बनले.
येथील एसजीपीडी पार्किंग जागेपासून कार्निव्हल मिरवणूक निघाली. यावेळी किंग मोमो शानू दी मुंगुल यांनी व्हिवा कार्निव्हलचा नारा देऊन ‘खा प्या मजा करा’ असा संदेश दिला. फातोर्ड्यातील सर्व प्रभागांत ही मिरवणूक निघाली. यात उषा सरदेसाई, गोवा फॉरवर्डचे कार्यकर्ते तसेच सरदेसाई यांचे समर्थक उपस्थित होते. मागाहून संगीत रजनीचा कार्यक्रम आयोजित केला होता. लोकांनी त्याचा मनमुराद आनंद लुटताना खाद्यपदार्थ स्टॉलवरील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.