Margao Bike Theft: मौजमजेसाठी दुचाकी चोरणारे अखेर गजाआड, मडगावातील घटना; संशयितांना दोन दिवस कोठडी

Goa Crime News: मौजमजेसाठी व श्रीमंतीचा थाट मिरवण्यासाठी दुचाकी चोरून आपली हौस भागविणाऱ्या त्या तीन दुचाकी चोरट्यांना शेवटी कर्माची फळे भोगावी लागली.
Margao Bike Theft
Margao Bike TheftDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मौजमजेसाठी व श्रीमंतीचा थाट मिरवण्यासाठी दुचाकी चोरून आपली हौस भागविणाऱ्या त्या तीन दुचाकी चोरट्यांना शेवटी कर्माची फळे भोगावी लागली असून,अधिक तपासासाठी त्यांना सोमवारी न्यायालयात उभे केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात आली.

या संशयितांची सध्या मडगाव पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. हे सर्व संशयित गोव्यात हमाल म्हणून काम करीत असून,पार्क केलेली दुचाकी चोरून ते त्यावर बसून फेरफटका मारून मजा लुटत होते, असेही प्राथमिक पोलिस तपासात आढळून आले आहे.

Margao Bike Theft
Goa Unemployment Rate: गोव्यात बेरोजगारी 8.3 टक्के! युवकांना रोजगार देण्यात भाजप सरकार अपयशी, काँग्रेसची टीका

मोहम्मद शेख, प्रसन्नजीत बर्मन व राजा हिरेमठ अशी या संशयितांची नावे आहेत. अहमद हुसेन पटेल यांनी आपली ‘होंडा अ‍ॅक्टिव्हा ५जी’ ही दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार मडगाव पोलिसांत नोंदवली होती. यानंतर मडगाव पोलिसांनी गुन्हा नोंद करत तपास सुरू केला होता. मागाहून पोलिसांनी वरील चोरट्यांचा छडा लावून त्यांच्या मुसक्या आवळल्या.

पोलिस स्थानकात आणून त्यांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर पटेल यांची दुचाकी चोरल्याची कबुलीही दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीला गेलेल्या एकूण सहा दुचाकी जप्त केल्या.

Margao Bike Theft
Goa Accident: दोनापावल-बांबोळी मार्गावर आलिशान भरधाव कारचा कहर; ठोकर दिल्याने तरुणी ठार, युवक गंभीर

पेट्रोल संपताच दुचाकी टाकून द्यायचे

संशयित पार्क करून ठेवलेल्या दुचाकी पळवत होते. मागाहून त्याचा वापर करीत होते. दुचाकीच्या टाकीतील पेट्रोल संपल्यानंतर निर्जनस्थळी त्या ठेवून अन्य दुचाकी चोरण्याच्या कामाला लागत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com