मराठी राजभाषेसाठी मतभेद विसरून एकत्र येऊ! गोव्यात संघटित संघर्षाचा निर्धार; माशेल येथील तिसऱ्या साहित्य संमेलनात ठराव

Marathi Language Goa: मराठीच्या हक्कासाठी निर्णायक आणि संघटित लढ्याची हाक देणारा हा ठराव संमेलनाचे सर्वांत महत्त्वाचे फलित ठरला.
Marathi Language Goa
Marathi Language GoaDainik Gomantak
Published on
Updated on

खांडोळा : गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा यासाठी सर्व मराठीप्रेमी संस्था, चळवळी व संघटनांनी आपापले मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे आवश्यक आहे, असा ठराव माशेल येथे झालेल्या तिसऱ्या मराठी राजभाषा साहित्य संमेलनात एकमताने मंजूर करण्यात आला. उपस्थित मराठीप्रेमींनी टाळ्यांच्या कडकडाटात या ठरावाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला.

मराठीच्या हक्कासाठी निर्णायक आणि संघटित लढ्याची हाक देणारा हा ठराव संमेलनाचे सर्वांत महत्त्वाचे फलित ठरला. गोमंतकाची माती, लोकजीवन, संस्कृती आणि परंपरेत मराठी भाषा खोलवर रुजलेली असून तिच्या संवैधानिक हक्कांसाठी आता एकत्रित कृती अपरिहार्य असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

हा ठराव संमेलनाचे कार्याध्यक्ष नोनू नाईक यांनी मांडला, तर ‘मराठी असे आमुची मायबोली’ संस्थेचे प्रमुख प्रकाश भगत यांनी त्यास अनुमोदन दिले.संमेलनात इतरही महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. तिसऱ्या मराठी राजभाषा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत महादेव गावस यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव विजय नाईक यांनी मांडला तर अशोक घाडी यांनी त्यास अनुमोदन दिले.

प्रियोळ मतदारसंघातील बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या मराठी शाळांचे आधुनिकीकरण व पुनरुज्जीवन केल्याबद्दल प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांचे अभिनंदन करणारा ठरावही संमेलनात मंजूर झाला. या ठरावाचा प्रस्ताव अ‍ॅड. विनायक नार्वेकर यांनी मांडला, तर रामदास भगत यांनी त्यास अनुमोदन दिले.

मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या जतन-संवर्धनासाठी ठोस दिशा देणारे हे ठराव संमेलनाच्या वैचारिक ताकदीचे प्रतीक ठरले.

मराठी राजभाषा दर्जासाठी संघटित, व्यापक आणि निर्णायक आंदोलन उभारण्याची गरज अधोरेखित करत संमेलनाने गोव्यातील मराठी चळवळीला नवी धार दिली, अशी भावना उपस्थित मराठीप्रेमींनी व्यक्त केली. ठरावांचे वाचन डॉ. मधू घोडकिरेकर यांनी केले.

Marathi Language Goa
Marathi Official Language: 'राजभाषेचा दर्जा द्या अन् वाद मिटवा'! मराठीप्रेमींचे आवाहन; मुख्यमंत्री निवासापुढे आंदोलनाचा दिला इशारा

योग्य स्थान मिळावे

गोव्यातील सर्व स्तरांवरील शिक्षण व्यवस्थेत मराठी विषयाला सन्मानाचे व योग्य स्थान देण्यात यावे, तसेच नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत मराठीला अग्रक्रम द्यावा, असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. हा ठराव प्रकाश भगत यांनी मांडला तर पत्रकार अवित बगळे यांनी त्यास अनुमोदन दिले.

Marathi Language Goa
Marathi Language: "मराठीला मानाचे स्थान दिल्याशिवाय मराठीप्रेमी गप्प बसणार नाही"! फर्मागुढीतील मातृशक्ती मेळाव्यात इशारा

प्रमुख ठराव

   गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यासाठी संघटित लढ्याची हाक

 मराठीप्रेमी संस्था व संघटनांनी मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

 शिक्षणाच्या सर्व स्तरांवर मराठी भाषेला योग्य व सन्मानाचे स्थान

 नव्या शैक्षणिक धोरणात मराठीला अग्रक्रम

 मराठी शाळांचे आधुनिकीकरण व पुनरुज्जीवन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com