
तिस्क फोंडा येथील ग्लोबल विजन या चष्म्यांच्या दुकानाला शनिवारी सकाळी आग लागली. फोंडा अग्निशमन दळाच्या पथकाने त्वरित धाव घेत आग आटोक्यात आणली. आगीचे निश्चित कारण स्पष्ट झाले नसले तरी विजेचा दाब वाढल्याने शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. नुकसानीचा आकडा अद्याप उपलब्ध झाला नाही.
आज टोंक पणजी येथे गांजाचे आणखी एक रोप सापडले.
प्रियोळचे लोकं आणि खासकरुन महिला तृणमूलच्या त्या अर्जांचा हिशोब घेण्यासाठी राहीले आहेत. सरकारात राहून विधाने करण्याऐवजी त्यांनी सरकारातून बाहेर पडून मग बोलावे. मंत्री गोविंद गावडेंचे दिपक ढवळीकरांना प्रत्त्युत्तर.
युथ ब्रिगेडला पक्षाच्या संघटनात्मक कामात सहभागी करून घेण्याची गरज आहे, पण काही ज्येष्ठांचीही सहभाग महत्वाचा.
भाजपच्या उत्तर गोवा जिल्हाध्यक्षपदी दयानंद कारबोटकर यांची बिनविरोध निवड. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मंत्री रोहन खंवटे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन केले.
रेतीचा मार्ग मोकळा; मांडवी-झुआरीतून उपशासाठी ईसी मिळणार. सविस्तर वृत्त वाचा आजच्या दै.गोमन्तकमध्ये.
भाजपचे केंद्रीय नेतृत्व गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष ठरवणार असून, माझ्या कार्यकाळात प्रदेशाध्यक्ष पदाला पूर्ण न्याय दिला. सदानंद शेट तानावडे यांची माहिती.
माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.