Mapusa Cancer Awareness: महिलांमध्ये उद्भवणारा स्तन कर्करोगासारखाच गर्भाशयाचा कर्करोग हा जीवघेणा रोग देशात पसरू लागला आहे. या घातक रोगाची माहिती महिलांना देणे आमचे आद्यकर्तव्य आहे.
म्हणूनच मेघाश्रय या संघटनेच्या माध्यमातून भारतभर भ्रमंती करून महिलांना जागृत करून गर्भाशय कर्करोग मुक्त भारत करण्याचा आमचा मनोदय आहे, अशी माहिती मेघाश्रय संस्थेच्या प्रवर्तक सीमा सिंग यांनी दिली.
म्हापसा येथे आयोजित शिबिरात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आयोजक सुभाष केरकर, नगरसेवक सुधीर कांदोळकर व नगरसेविका अन्वी कोरगावकर उपस्थित होत्या.
सीमा सिंग म्हणाल्या की, पंधरा वर्षांवरील मुली तसेच स्त्रियांना या दुर्धर रोगाची लागण होऊ शकते. कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून मासिक पाळीच्या वेळी महिलांनी काळजी घ्यायला हवी, स्वच्छ रहावे.
नगरसेविका अन्वी कोरगावकर व सुधीर कांदोळकर यांनी मनोगत व्यक्त केले. सुरवातीला स्वागत व प्रास्ताविक सुभाष केरकर यांनी केले.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय सिद्धेश धावसकर यांनी करून दिला, तर सूत्रसंचालन व आभार मिलन वांगणकर यांनी मानले.
प्रतिबंधात्मक लस निर्मितीचे काम सुरू
गर्भाशयाचा कर्करोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक लसची निर्मिती चालू असून सरकारकडून त्यास मान्यता मिळायची आम्ही वाट पाहात आहोत. महिला सशक्त व सक्षम असाव्यात आत्मनिर्भर असाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत.
प्रत्येक घराघरांत आणि गावागावांत या विषयावर चर्चा होऊन जनजागृती व्हावी यासाठी आम्ही धडपडत आहोत. तज्ज्ञ डॉक्टरांसोबत पुन्हा एकदा आम्ही तुमच्या भेटीस येऊ, असे सीमा सिंग म्हणाल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.